सिडको विभागातील  पाच हॉटेल्सवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 01:04 AM2018-06-13T01:04:27+5:302018-06-13T01:04:27+5:30

Hathoda has five hotels in the CIDCO category | सिडको विभागातील  पाच हॉटेल्सवर हातोडा

सिडको विभागातील  पाच हॉटेल्सवर हातोडा

Next

नाशिक : महापालिकेने बेकायदेशीर हॉटेल संदर्भातील कारवाईचा बडगा कायम ठेवला असून, मंगळवारी (दि. १२) सिडको विभागातील पाच हॉटेल्सवर हातोडा चालविण्यात आला आहे. शहरातील पंकज पाटील यांच्या मालकीचे हॉटेल गार्गी यांचे वीस बाय पंचवीस मापाचे छतावरील हॉटेल होते. त्यासाठी छतावर पत्रे, बाजूने नेट व लाकडी फळ्या वापरण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर पाटील यांच्या मालकीच्या या मराठी व्हेज व नॉनव्हेज हॉटेलचे १५ बाय वीस आकाराचे अतिक्रमण बांबू तसेच पाल आणि झाडाची पाने वापरून शेड तयार करण्यात आले होते. याच ठिकाणी वीट बांधकाम, छतावर पत्रे व किचनचा वापर करण्यात आला होता. तसेच पंकज शेलार यांच्या हॉटेल साईकिरणमध्ये अनधिकृत शेड होते.

Web Title: Hathoda has five hotels in the CIDCO category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.