सकारात्मक दृष्टिकोन बाळगा: प्रतिभा विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 12:49 AM2020-02-21T00:49:22+5:302020-02-21T00:49:47+5:30
महाविद्यालयीन शिक्षण घेताना सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. आपल्यातील कमतरता शोधून करिअर करून जीवनाची वाटचाल यशस्वी करा, असे प्रतिपादन मुंबई येथील लेखिका प्रा. प्रतिभा विश्वास यांनी केले.
नाशिकरोड : महाविद्यालयीन शिक्षण घेताना सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. आपल्यातील कमतरता शोधून करिअर करून जीवनाची वाटचाल यशस्वी करा, असे प्रतिपादन मुंबई येथील लेखिका प्रा. प्रतिभा विश्वास यांनी केले.
बिटको महाविद्यालयाच्या ५७ व्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रा. विश्वास बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय सचिव प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, प्राचार्य डॉ. धनेश कलाल, कोटमगावचे सरपंच बाळासाहेब म्हस्के, उपप्राचार्य डॉ. डी. जी. बेलगावकर, डॉ. संजय तुपे, डॉ. मंजुषा कुलकर्णी, डॉ. महेश औटी, डॉ. विजया धनेश्वर, समाधान जाधव, भाऊसाहेब म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यशवंत रारावीकर उत्कृष्ट संशोधक पुरस्कार - डॉ. अनिल पाठारे, प्राचार्य ह. मा. रायरीकर उत्कृष्ट प्राध्यापक पुरस्कार- डॉ. मंजुषा कुलकर्णी, प्रा.नितीन पाटील, प्रा.वर्षा शेळके. शालेय पुरस्कार - मानसी सागर, सरला देवरे, सुनीता पुजारी, उत्कृष्ट प्राध्यापक पुरस्कार- प्रा. डॉ. प्रकाश लांडगे, अंजली कुलकर्णी, विशेष सहकार्य पुरस्कार - प्रा. राजन माताडे, आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार -सुवर्णा इंगोले, रमेश काळे, संदीप करवंदे, दुर्गेश चौधरी, उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार - शिवा शहाणे यांना देण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाच्या प्रगतीच्या कार्याचा आढावा प्राचार्य डॉ. धनेश कलाल यांनी घेतला. आभार प्रा. पगारे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.