अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता वैज्ञानिक दृष्टी ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 11:52 PM2019-12-26T23:52:01+5:302019-12-26T23:53:00+5:30
अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका, त्यात विज्ञान दडलेले असते. तुम्ही वैज्ञानिक दृष्टी ठेवली तर अंधश्रद्धेला बळी पडणार नाही, असा सल्ला प्रा. वसंत सोनवणे यांनी दिला.
सिन्नर : अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका, त्यात विज्ञान दडलेले असते. तुम्ही वैज्ञानिक दृष्टी ठेवली तर अंधश्रद्धेला बळी पडणार नाही, असा सल्ला प्रा. वसंत सोनवणे यांनी दिला.
तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बहि:शाल शिक्षण मंडळ यांच्या वतीने आयोजित यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेत ते बोलत होते. प्रा. सोनवणे यांनी करणी कशी काढतात त्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले.
यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेचे पहिले पुष्प प्रा.आर. के. मुंगसे यांनी रसास्वाद या विषयावर गुंफले. त्यांनी विद्यार्थ्यांना आई-वडिलांची आज्ञा पाळेल, त्यांचा शब्द ओलांडून मी कोणतेही पाऊल उचलणार नाही, अशी विद्यार्थ्यांना शपथ दिली. दुसरे पुष्प सोनवणे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर गुंफले. त्यांनी व्याख्यानात गुरुत्वाकर्षण, अगरबत्ती फिरविणे, नारळातून करणी काढणे, तोंडातून दोरा काढणे, नाकाने दूध काढणे, होम पेटविणे ही प्रात्यक्षिके करून दाखविली. यामुळे विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टीचे आकर्षण वाढले. कुढल्याही अंधश्रद्धेला व भोंदूबाबांना बळी पडू नये असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक एस.बी. देशमुख यांनी मार्गदर्शन केले. बी.आर.चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. सी.बी. शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. सविता देशमुख यांनी आभार मानले. तिसरे पुष्प आर. डी. शिंदे यांनी कथाकथन या विषयावर गुंफले. त्यांनी एखादी गोष्ट सांगताना ती कशी कथन करावी, एखादी कथा आपल्या शारीरिक देहबोलीभाषेत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांतून समजावून सांगितली. कथा सांगताना शरीराचे हावभाव करून विद्यार्थ्यांना गोष्टी पटवून दिल्या. तुम्हीसुद्धा कथाकथन करताना तुमचे कलागुण वापरून कथाचा मथितार्थ समजावून सांगू शकता, असे विद्यार्थ्यांना सांगितले.