‘तुमच्यातील उमेद संपली आहे का?

By Admin | Published: June 19, 2014 12:02 AM2014-06-19T00:02:15+5:302014-06-19T00:59:28+5:30

’नाशिक : ‘तुमच्यातील उमेदच संपली आहे, की कामच करायचे नाही?’ - असा सवाल करीत बुधवारी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी महसूल अधिकाऱ्यांना धारेवर धरून झाडाझडती घेतली.

'Have you lost your zeal? | ‘तुमच्यातील उमेद संपली आहे का?

‘तुमच्यातील उमेद संपली आहे का?

googlenewsNext

’नाशिक : ‘तुमच्यातील उमेदच संपली आहे, की कामच करायचे नाही?’ - असा सवाल करीत बुधवारी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी महसूल अधिकाऱ्यांना धारेवर धरून झाडाझडती घेतली. अधिकाऱ्यांमधील सांघिकपणाचा अभाव व कामचुकारपणा निदर्शनास आल्याने त्यांनी ‘येथे एक तरी दिवा आहे का’ अशी विचारणा करून अधिकाऱ्यांचा ‘होमवर्क’ घेतला; पण त्यातही बहुतांशी अनुत्तीर्णच झाल्याचे पाहून, ‘येत्या तीन महिन्यांत कामकाज दुरुस्त करा अन्यथा कारवाई करू,’ अशी धमकीही त्यांनी दिली.
महसूल खात्याशी संबंधित जवळपास ६१ विषयांबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी काय कामे केली तसेच त्यांच्या या कामांबाबतच्या कल्पना काय आहेत यावर विभागीय आयुक्तांनी गुणांकन ठरवून दिले होते. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून प्रत्येक अधिकाऱ्याने स्वत:ला या कामात झोकून देऊन तयारी केली होती. प्रत्यक्षात आज बैठकीला सुरुवात होताच, अनेकांना माना खाली घालाव्या लागल्या. सकाळी दहाच्या ठोक्याला जिल्हाधिकारी कार्यालयात हजर झालेल्या विभागीय आयुक्तांनी त्यांच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ घेऊन सरसावलेल्या अधिकाऱ्यांना मज्जाव करून, ‘स्वागत नको, काम हवे’ असे संकेत दिले व थेट मुद्द्यांना हात घालून विषयानुरूप माहिती विचारण्यास सुरुवात केली. सातबारा संगणकीकरण, शासकीय दाखले, फेरफार नोंदी, पीकपाणी, शासकीय वसुली, राजस्व अभियान, गौण खनिज, सेतू अशा एक नव्हे तर अनेक विषयांना हात घालून केलेल्या विचारणेत सर्वच अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनाच उद्देशून ‘तुमचे लक्ष नाही, की वचक नाही’ अशी विचारणा केली, तर याचवेळी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनाही ‘झोपा काढण्यापेक्षा को-आॅर्डिनेट केलेले बरे’ असा सल्ला दिला. जिल्ह्णात खाणपट्ट्यांची संख्या सांगता न आल्याने अपर जिल्हाधिकारीही या झापाझापीतून सुटले नाहीत. इगतपुरीच्या प्रश्नावर तहसीलदार वेगळी माहिती व प्रांत अधिकारी वेगळी माहिती देत असल्याचे पाहून दोघांनाही ‘थापा मारू नका, मला आवडत नाही’ असा इशारा दिला. मालेगाव येथील एक वाळूचा ठिय्या एक कोटी ७३ लाख रुपयांना कसा गेला याबद्दल शंका उपस्थित करून, त्यातून ठेकेदार किती वाळू उपसा करतो याची माहिती त्यांनी मालेगावच्या तहसीलदार व प्रांत अधिकाऱ्यांना विचारली. यावर ते समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने गौण खनिज चोरांवर कारवाई करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले. जिल्ह्णातील खाणपट्टे किती व त्यांचे मोजमाप करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.तब्बल चार तास चाललेल्या या बैठकीत विभागीय आयुक्तांचे अपवादात्मक समाधान होईल अशा प्रकारे विषयानुरूप चर्चा झाली. त्यामुळे वैतागलेल्या आयुक्तांनी ‘अजगर’सारखे सुस्तावलेले असाल तर कामांचे मूल्यमापन करावे लागेल, अशी तंबी दिली.
विद्यार्थ्याची आत्महत्त्या
तामलवाडी : माध्यमिक शालांत परीक्षेत नापास झाल्याने १६ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील काटी शिवारात बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
उमेश जालिंदर डवरी (१६) असे मयत विद्यार्थ्याचे नाव असून, तो काटी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत होता. मार्च २०१४ मध्ये त्याने माध्यमिक शालांत परीक्षा दिली होती. मंगळवारी दहावीचा निकाल पाहण्यासाठी तो तुळजापूर येथे गेला होता. मात्र, परीक्षेत नापास झाल्याचे कळाल्यानंतर त्याने आत्महत्या केली. त्याचा मृतदेह बुधवारी दुपारी शेतकऱ्यांना आढळून आला. मयत उमेश डवरी हा नान्नज येथील रहिवाशी आहे. आई-वडीलांचा मृत्यू झाल्याने तो काटी येथे मामाकडे राहून शिक्षण घेत होता.

Web Title: 'Have you lost your zeal?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.