एसटीने प्रवास करणारे आमदार पाहिलेत का? एस.टी. महामंडळ म्हणते, रेकॉर्डच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:18 AM2021-08-12T04:18:13+5:302021-08-12T04:18:13+5:30

नाशिक : महाराष्ट्राच्या आजी, माजी आमदार यांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. ...

Have you seen MLAs traveling by ST? S.T. The corporation says there is no record | एसटीने प्रवास करणारे आमदार पाहिलेत का? एस.टी. महामंडळ म्हणते, रेकॉर्डच नाही

एसटीने प्रवास करणारे आमदार पाहिलेत का? एस.टी. महामंडळ म्हणते, रेकॉर्डच नाही

Next

नाशिक : महाराष्ट्राच्या आजी, माजी आमदार यांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. या आमदारांना त्यांच्या पत्नीसह किंवा एका सहकाऱ्यासह एस. टी. महामंडळाच्या सर्व बसेसमधून मोफत प्रवास करण्याची सवलत देण्यात आलेली आहे. २०१८ मध्ये आमदारांना बसमधून मोफत प्रवास देण्यात आल्याचे परिपत्रक काढण्यात आले असले तरी या तीन-साडेतीन वर्षांच्या कालावधीत किती आमदारांनी बसेसमधून प्रवास केला, याची माहिती मात्र उपलब्ध झालेली नाही. आजी-माजी आमदारांच्या प्रवासामुळे लोकांमध्ये एसटीतून प्रवास करण्याचा सकारात्मक संदेश जाईल, या विचारातून ही योजना राबविण्यात आली मात्र अचूक माहिती नाशिक विभागीय एस.टी. महामंडळाला देता आलेली नाही.

--इन्फो--

असा आहे आमदारांचा एस.टी. प्रवास

२०१८-००

२०१९-०

२०२०-०

२०२१-०

--इन्फो--

कधी एस.टी.मधून प्रवास केला आहे का?

मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने एस.टी. मधून प्रवास करण्याचा योग आला. २०१७ मध्ये नाशिक ते पुणे असा शिवशाही बसमधून प्रवास केला आहे. त्यानंतर तसा काही योग आलेला नाही. धावपळीचे काम असल्यामुळे खासगी वाहनातूच प्रवास करण्याची वेळ येते.

- सीमा हिरे, आमदार

गेले दीड वर्ष कोरोना असल्यामुळे बसेस तशाही बंदच आहेत. त्यामुळे आमदार म्हणून बसमधून प्रवास करण्याची वेळ आलेली नाही. लोकप्रतिनिधींना बसमधून प्रवासाची मुभा असली तरी त्याचा लाभ अद्याप घेतलेला नाही.

-राहुल ढिकले, आमदार

आमदार असताना एक-दोनदा लग्नकार्याच्या कार्यक्रमासाठी बसमधून प्रवास करण्याचा प्रसंग आलेला आहे. परंतु तोही फार कमी. लोकप्रतिनिधींना बस प्रवासाची सवलत असल्याने त्याचा लाभ घेण्यासाठी प्रवास केलेला नाही. मात्र आमदारकीपूर्वी बसमधूनच प्रवास असायचा.

- बाळासाहेब सानप, माजी आमदार

--इन्फो--

चारचाकीत फिरणाऱ्यांना कशाला हवी सवलत?

विधान परिषदेत किंवा विधानसभेत निवडून आलेल्या आजी आणि माजी सदस्यांना त्यांच्या पत्नी किंवा एका सहकाऱ्यासह एस.टी. च्या कोणत्याही प्रकारच्या बसमधून विनामूल्य प्रवासाची सवलत दिली जाते. ज्यांच्याकडे आलिशान गाड्या आहेत असे लोकप्रतिनिधी बसचा वापर करणार नाहीत, असे माहीत असूनही त्यांना मोफत सुविधा कशासाठी?

- दत्तात्रय सगर, नागरिक

लोकप्रतिनिधींच्या कामाची धावपळ तसेच सातत्याने कारावी लागलेली भ्रमंती यामुळे असे लोक निर्धारित वेळत सुटणाऱ्या बसेसमधून प्रवास करतील कशाला? माजी आमदारांसाठी ही सुविधा योग्य असली तरी त्यांच्याकडूनही बसचा वापर अभावानेच होत असावा. याबाबतचा पुन्हा आढावा घेऊन गरजू घटकांना सवलतीचा लाभ मिळावा.

- सुधाकर रामराजे, नागरिक

Web Title: Have you seen MLAs traveling by ST? S.T. The corporation says there is no record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.