कहर कायम, चाचण्यांमुळे बाधितांच्या संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 11:42 PM2020-07-25T23:42:10+5:302020-07-25T23:43:01+5:30

नाशिक : शहरात कोरोनाचा कहर कायम असून, चाचण्या वाढल्याने बाधितांची संख्यादेखील वाढली आहे. शहरात गेल्या चोवीस तासांत ५१९ बाधित आढळले आहेत, तर ११ जणांचा मृत्यू झाला यात वडाळा, पंचवटी आणि जुन्या नाशिकमधील जास्त बाधितांचा समावेश आहे. दरम्यान, बाधितांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

The havoc persists, with tests increasing the number of victims | कहर कायम, चाचण्यांमुळे बाधितांच्या संख्येत वाढ

कहर कायम, चाचण्यांमुळे बाधितांच्या संख्येत वाढ

Next
ठळक मुद्देशहरात चोवीस तासांत कोरोनाचे तब्बल ११ बळी५१९ रुग्णांची नोंद।

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरात कोरोनाचा कहर कायम असून, चाचण्या वाढल्याने बाधितांची संख्यादेखील वाढली आहे. शहरात गेल्या चोवीस तासांत ५१९ बाधित आढळले आहेत, तर ११ जणांचा मृत्यू झाला यात वडाळा, पंचवटी आणि जुन्या नाशिकमधील जास्त बाधितांचा समावेश आहे. दरम्यान, बाधितांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच आढळल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरात मृत्युदर कमी करण्यासाठी चाचण्या वाढविण्यात आल्या असून, त्यातून मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. तथापि, त्याला अद्याप संपूर्ण यश आलेले नाही. शहरात एकूण ११ बाधितांचा मृत्यू झाला आहे. शहरातील वडाळा परिसरातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात एका ५८ वर्षीय महिलेचा, तर महेबूबनगर येथील ५१ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सारडा सर्कल येथील ७३ वर्षीय वृद्ध तसेच जुन्या नाशिकमधील ६७ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा कोरोना संसर्गाने बळी गेला आहे. कानिफनाथनगर येथील हेरंब सोसायटी परिसरात एकाचा मृत्यू झाला आहे. पंचवटीत अमृतधाम परिसरातील बिडी कामगार सोसायटी येथील ६९ वर्षीय पुरुष तसेच पंचवटीतील ४७ वर्षीय पुरुष, दिंडोरीरोडवरील गुलमोहोर कॉलनीतील ४२ वर्षीय पुरुष रुग्ण आणि दिंडोरीरोडवरील शिवनगर येथील ६८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. सिडकोतील ६५ वर्षीय रुग्णाचा, तर देवळालीगाव येथील हरिधाम परिसरातील ६५ वृद्ध पुरुषाचा कोरोनामुळे संसर्गामुळे मृत्यू झाला. या अकरा बळींमुळे २४५ कोरोबाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्युदराचे आॅडिट होणारशहरात सातत्याने प्रयत्न करूनदेखील मृत्युदर कमी होत नसल्याने आता मृत्युदराचेच आॅडिट करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतला आहे. यासंदर्भात प्रशासनाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सदरचा मृत रुग्ण प्रतिबंधित क्षेत्रातील होता काय, रुग्ण हाय रिस्क की लो रिस्क, रुग्णास कधीपासून त्रास सुरू झाला, रुग्णाने कोणत्या रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतले, चाचणी पॉझिटिव्ह कधी आली, त्यांनतर उपचार कुठे घेतले आणि रुग्णाला अन्य काही आजार होते काय याबाबत हे आॅडिट असेल. यापूर्वी डेथ आॅडिटदेखील महापालिकेने केले आहे. शहरात बाधितांची संख्यादेखील वाढली आहे. शहरात महापालिकेच्या वतीने दाट वस्त्यांमध्ये कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. तसेच नगरसेवक आणि राजकीय पक्षांनी तसेच सेवाभावी संस्थेच्या वतीनेदेखील चाचण्या वाढविण्यात आल्याने बाधितांच्या संख्येत वाढ अपेक्षित होते. त्यामुळे ५१९ बाधित वाढले आहेत. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या ७ हजार ५०५ इतकी संख्या झाली आहे. अर्थात, यातील ५ हजार ४४३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

Web Title: The havoc persists, with tests increasing the number of victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.