हॉकर्स, टपरीधारकांचा मनपावर ‘खबरदार’ मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 12:26 AM2017-08-02T00:26:22+5:302017-08-02T00:26:50+5:30

‘लाठी, गोली खायेंगे, गाडी, टपरी, टोकरी वही लगायेंगे’, ‘हॉकर्स झोन फेक दो’, ‘ग्राहक तेथे हॉकर्स झोन झालेच पाहिजेत’... या घोषणा देत शहरातील हॉकर्स, टपरीधारक यांनी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढत प्रस्तावित हॉकर्स झोनला जोरदार विरोध दर्शविला. दरम्यान, हॉकर्स व टपरीधारकांच्या सर्व संघटना मिळून गठित करण्यात आलेल्या कृती समितीने आक्रमक पवित्रा घेत यापुढे व्यापक आंदोलनाचे संकेत दिले.

Hawker's, Caretaker's Care 'Bewarer' Front | हॉकर्स, टपरीधारकांचा मनपावर ‘खबरदार’ मोर्चा

हॉकर्स, टपरीधारकांचा मनपावर ‘खबरदार’ मोर्चा

Next

नाशिक : ‘लाठी, गोली खायेंगे, गाडी, टपरी, टोकरी वही लगायेंगे’, ‘हॉकर्स झोन फेक दो’, ‘ग्राहक तेथे हॉकर्स झोन झालेच पाहिजेत’... या घोषणा देत शहरातील हॉकर्स, टपरीधारक यांनी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढत प्रस्तावित हॉकर्स झोनला जोरदार विरोध दर्शविला. दरम्यान, हॉकर्स व टपरीधारकांच्या सर्व संघटना मिळून गठित करण्यात आलेल्या कृती समितीने आक्रमक पवित्रा घेत यापुढे व्यापक आंदोलनाचे संकेत दिले.
महापालिका आयुक्तांनी शहरातील सहाही विभागात प्रत्येकी पाच हॉकर्स झोन कार्यरत करण्याचे आदेश विभागीय अधिकाºयांना दिले आहेत तसेच यापुढे कोणताही बदल हॉकर्स झोनमध्ये होणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील हॉकर्स, टपरीधारक व रस्त्यावरील विक्रेत्यांच्या संघटनांनी एकत्र येत कृती समिती गठित केली आणि मंगळवारी (दि.१) महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनवर मोर्चा आणला. या मोर्चाचे नेतृत्व सुनील बागुल, शांताराम चव्हाण, शिवाजी भोर, शशिकांत उन्हवणे, सय्यद युनूस, बाळासाहेब उगले, पुष्पा वानखेडे, सुनील संधानशिव, दिनेश जाधव, नीलेश कुसमोडे, नवनाथ ढगे, संदीप जाधव आणि जावेद शेख यांनी केले. बी. डी. भालेकर हायस्कूलपासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. यावेळी हॉकर्स झोनविरुद्धचे फलक हाती घेत फेरीवाल्यांनी महापालिका प्रशासनाचा निषेध केला व एकतर्फी हॉकर्स झोनचा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली. मोर्चा मुख्यालयावर येऊन धडकल्यावर प्रमुख पदाधिकाºयांची भाषणे झाली. हॉकर्स झोनमध्ये विक्रेत्यांना स्थलांतरित करण्याचे दिलेले एकतर्फी आदेश रद्द करण्याची मागणी यावेळी एकमुखाने करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पदाधिकाºयांनी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे व उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. मंगळवारी आयुक्त उपस्थित नसल्याने त्यांची भेट घेऊन त्यांना पुन्हा गाºहाणे मांडण्यात येणार असल्याचे पदाधिकाºयांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Hawker's, Caretaker's Care 'Bewarer' Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.