‘हॉकर्स झोन’ला दिरंगाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 01:08 AM2017-09-03T01:08:25+5:302017-09-03T01:08:25+5:30
महापालिकेने राष्टÑीय फेरीवाला धोरणांतर्गत तयार केलेल्या हॉकर्स झोनच्या अंमलबजावणीत दिरंगाई करणाºया पंचवटी, नाशिकरोड आणि पश्चिमच्या विभागीय अधिकाºयांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.
नाशिक : महापालिकेने राष्टÑीय फेरीवाला धोरणांतर्गत तयार केलेल्या हॉकर्स झोनच्या अंमलबजावणीत दिरंगाई करणाºया पंचवटी, नाशिकरोड आणि पश्चिमच्या विभागीय अधिकाºयांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.
महापालिकेने हॉकर्स झोनचा आराखडा तयार केला असून, त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरुवात करण्यात आली आहे. विभागनिहाय प्रत्येकी दोन ठिकाणी प्राथमिक पातळीवर हॉकर्स झोन तयार करण्याच्या सूचना यापूर्वीच आयुक्तांनी सहाही विभागाच्या अधिकाºयांना दिलेल्या आहेत. त्यानुसार, विभागीय अधिकाºयांमार्फत त्याची अंमलबजावणी सुरूही झाली आहे. प्रत्येक विभागात नो हॉकर्स झोनचे फलक लावले जात असून, नो हॉकर्स झोनमध्ये अनधिकृतपणे व्यवसाय करणाºया विक्रेत्यांना हटविण्याची मोहीमही अतिक्रमण विभागामार्फत सुरू आहे. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, प्रशासन उपआयुक्त हरिभाऊ फडोळ आणि अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी सहाही विभागात संयुक्तपणे पाहणी दौरा केला असता, नाशिकरोड, पंचवटी आणि पश्चिम विभागात हॉकर्स झोनची समाधानकारकपणे अंमलबजावणी केली जात नसल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार, प्रशासनाने नाशिकरोडचे विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, पंचवटीचे राजेंद्र गोसावी आणि पश्चिमचे नितीन नेर यांना नोटीस बजावली आहे. येत्या १५ दिवसांत समाधानकारक काम झाले नाही तर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे नोटिशीत म्हटले आहे.