अन्न पाण्याच्या शोधार्थ हरणाची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 05:54 PM2019-02-18T17:54:14+5:302019-02-18T17:54:30+5:30

राजापूर : राजापूर व परिसरात मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी काळवीट व हरणांच्या संकेत समाधानकारक वाढ झाली असून ममदापूर संवर्धन राखीव झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात देखील घट झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

 Hayat | अन्न पाण्याच्या शोधार्थ हरणाची भटकंती

अन्न पाण्याच्या शोधार्थ हरणाची भटकंती

googlenewsNext
ठळक मुद्देराजापूर : यावर्षी काळवीट व हरणांच्या संकेत समाधानकारक वाढ

राजापूर : राजापूर व परिसरात मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी काळवीट व हरणांच्या संकेत समाधानकारक वाढ झाली असून ममदापूर संवर्धन राखीव झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात देखील घट झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
दरम्यान यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे राजापूर व परिसरातील काही प्रमाणात अन्न पाण्याच्या शोधासाठी भटकंती करण्याची वेळ हरणांवर आली आहे. राजापूर वन विभागाला मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र लाभले असून या परिसरात राजापूर, ममदापुर, सोमठाणजोश, खरवंडी, देवदरी, रेंडाळा, कोळगाव आदी गावांचा समावेश होतो.
या आठ गावातील मिळून साडेसात हजार वनक्षेत्र असून यापैकी साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावर ममदापुर राखीव हा प्रकल्प तयार केला आहे. यामध्ये राजापूर, ममदापुर, खरवंडी, देवदरी, सोमठाणजोश या पाच गावांचा वन क्षेत्राचा समावेश असून प्रत्येक गावात पशुपक्ष्यांच्या संरक्षणासाठी २०१४ मध्ये पथके निर्माण केली. त्यामुळे हरणांच्या व काळविटांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
राजापूर व परिसरात हरणांची संख्या ही जास्त असल्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना हरिण व काळविटांना करावा लागत आहे. पाण्याच्या शोधासाठी भटकंती करण्याची वेळ हरणावर आली आहे.आत्तापर्यंत विहिरींना कठडे नसल्यामुळे अनेक हरण दगावल्याच्या घटना या परिसरात घडल्या आहेत. त्यांच्या बजावाकरीता वन संवर्धनाच्या नावाखाली लाखो रुपये खर्च वन विभागाने केले आहे.
हरणाना पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी ठीक ठिकाणी पानवठे तयार करण्यात आली असून त्यामध्ये उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणी सोडण्यात येत,े तर राजापूर येथील पानवठ्यात पाणी भरण्यासाठी सौर उर्जेवरील पंप बसविण्यात आल आहे. त्याने दररोज पाणी त्यात भरण्यासाठी बोरवेल घेण्यात आला आहे, व त्यामधून पाणी काढण्यात येते संवर्धन झाल्यानंतर हरणासाठी गवताची लागवड करण्यात आली असून भविष्यात जंगलात निवारा शेड व वेगवेगळ्या जातीच्या गवताची लागवड करण्यात येणार आहे. तसेच शिकार थांबण्यासाठी रस्त्यावर चेक पोस्ट उभारण्यात येणार आहे.
सध्या दुष्काळी परिस्थिती जास्त असल्याने अन्न, पाण्याच्या शोधासाठी हरणांना रानोमाळ भटकंती शिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही वन विभागाने ठिकठिकाणी कुंड्या ठेवून पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

सन २०१८ मध्ये राजापूर परिक्षेत्रातील हरिण आणि काळविट यांची संख्या १४२० झाली आहे. येवला तालुक्यातील हरिण आणि काळवीटाची संख्या २४७५ च्या वर पोहचली आहे. अन्न व पाण्याच्या शोधासाठी काही हरिण देखील स्थालांतरित झाले असल्याचा अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. राजापूर परिसरात सगळी शेतीची नांगरट झाली असल्याने हरणांना खाण्यासाठी काहीच नाही. त्यामुळे हरणाचे कळप भटकंती करताना दिसत आहेत. 

Web Title:  Hayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल