आंब्याच्या पेट्यांमध्ये आढळले घातक रसायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 11:39 PM2018-04-29T23:39:37+5:302018-04-29T23:39:37+5:30
मालेगाव : बाजार समितीच्या भोंगळ कारभाराची चर्चामालेगाव : शनिवारी (दि. २८) येथील बाजार समिती आवारात आंब्याच्या पेट्यांमध्ये कॅल्शियम कार्बाइड रसायनाच्या पिशव्या आढळून आल्याने बाजार समितीच्या भोंगळ कारभाराची आज दुसऱ्या दिवशीही तालुक्यात चर्चा सुरू होती.

बाजार समितीत विक्रेत्यांकडून घातक रसायन वापरून पिकविलेले आंबे सर्रासपणे शहरातील नागरिकांना विकण्यात येत असून, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी याची कोणतीही दखल घेत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. घातक रसायन वापरून पिकविलेले आंबे बाहेरील व्यापाºयांकडून बाजार समितीत आले की स्थानिक व्यापाºयांनी आणले याबाबत उलगडा होऊ शकला नाही. प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये कॅल्शियम कार्बाइडची पावडर भरलेली आढळून आली, तर काही पिशव्यांवर झाडांची पाले बांधलेली होती. कच्च्या फळांमध्ये या पिशव्या ठेवल्यास फळे पिकल्यासारखी दिसतात. नंतर हीच फळे ग्राहकांना चढ्या भावात विकण्यात येतात. संबंधितांनी दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही मालेगावकर संघर्ष समितीचे पदाधिकारी निखिल पवार, देवा पाटील यांनी केली आहे.