ढगाळ वातावरणामुळे शेतातील पिके धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 05:47 PM2019-12-03T17:47:34+5:302019-12-03T17:47:54+5:30
खामखेडा : अवकाळी पावसानतर दररोज होण्यार्या वातावरणातील बदलामुळे शेतीतील पिकावर विविध रोगाचा प्रदुभाव होऊ लागल्याने शेतकरी चिंतातुर झाला असून शेतातील पीक वाचिवण्यासाठी औषधची फवारणी करीत पिके वाचिवण्याचा प्रयत्न करीत आहे.
खामखेडा : अवकाळी पावसानतर दररोज होण्यार्या वातावरणातील बदलामुळे शेतीतील पिकावर विविध रोगाचा प्रदुभाव होऊ लागल्याने शेतकरी चिंतातुर झाला असून शेतातील पीक वाचिवण्यासाठी औषधची फवारणी करीत पिके वाचिवण्याचा प्रयत्न करीत आहे.
चालू वर्षी परतीच्या पाऊसासह अवकाळी पाऊसाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातल्याने शेतातील खिरपाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यात हाताशी आलेल्या मका व बाजरीचा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.या अवकाळी पाऊसामुळे शेतात सतत पंधरा दिवस पाणी साचले व नंतर पंधरा दिवस शेतात मोठ्या प्रमाणात ओलावा असल्याने शेती तयार करता येत नव्हती. त्यामुळे शेतात मोठया प्रमाणात गवत झाले होते. तेव्हा शेतकरयाने शेतातील मका व बाजरी पिकाची कणसे व कडबा आवरून शेतातील गवताची साफसफाई करून शेती तयार करून गव्हू, हरभरा कांदे व भाजीपाला पिकाची लागवड केली आहे.
अवकाळी पाऊसाच्या आठ दिवस आदी काही शेतकरयांनी कांद्याची लागवड केलेली होती. ती पाऊस उघडल्या नंतर बर्यापैकी होती. तेव्हा शेतकरयाने पाऊस उघड्यांनंतर औषधाची फवारणी करून कांदा पिकात सुधारणा झाली होती. परंतु या ढगाळ वातावरणामुळे कांद्याची पात पिवळी पडून त्याच्या करप्पा व मावा रोगाचा प्रादुर्भाव दिसू होऊ लागला आहे. काही शेतकरयांनी उन्हाळी कांद्याचे महागडी असे बियाणे आणून टाकले होते.
कांद्याचे बियाणे उगवून एक मिहन्याचे झाले आहेत.आता एवढया पंधरा दिवसात कांद्याची उन्हाळी कांद्याची लागवड करण्यासाठी वेळ आहे. परंतु या ढगाळ वातावरणामुळे कांद्याच्या रोप पिवळी पडून अगरे करपू लागली आहेत. तेव्हा शेतकरी त्याच्यावर बुरशीजन्य औषधाची फवारणी करीत आहे.
दरवर्षी नोंव्हबर मिहन्यात थंडीत सुरवात होते असे व डिसेंबर मिहन्यात मोठ्या प्रमाणात थंडी राहत असे. थंडी हि रब्बी हंगामातील गव्हू, कांदे, हरभरा व भाजीपाला पिकासाठी पोषक असते. परंतु चालू वर्षी डिसेंबर मिहना सुरु झाला आहे. अजूनही थंडीची चाहूल दिसत नाही. अवकाळी पाऊस उघडल्यानंतर कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण यामुळे पिकाव तेजी दिसत नाही.