ह.भ.प. बंडातात्या कऱ्हाडकर यांची मुक्तता करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:11 AM2021-07-16T04:11:31+5:302021-07-16T04:11:31+5:30

राज्यातील सर्वात मोठा संप्रदाय असलेल्या वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. बंडातात्या कऱ्हाडकर यांना सरकारने पंढरपूर पायी वारीच्या पार्श्वभूमीवर स्थानबद्ध केले आहे. ...

H.B.P. Rebel Karhadkar should be released | ह.भ.प. बंडातात्या कऱ्हाडकर यांची मुक्तता करावी

ह.भ.प. बंडातात्या कऱ्हाडकर यांची मुक्तता करावी

googlenewsNext

राज्यातील सर्वात मोठा संप्रदाय असलेल्या वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. बंडातात्या कऱ्हाडकर यांना सरकारने पंढरपूर पायी वारीच्या पार्श्वभूमीवर स्थानबद्ध केले आहे. सरकारच्या या वर्तनाने महाराष्ट्रातील संपूर्ण वारकरी समाजात प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. सरकार एकीकडे निवडणुका पार पाडत आहेत. राजकीय सभा घेतल्या जात आहेत. दारूचे दुकाने खुलेआम सुरू आहेत. परंतु गेल्या दोन वर्षापासून भाविकांचे श्रद्धास्थान असलेली मंदिरे मात्र बंद आहेत. वारकऱ्यांची पंढरपूरची वारी बंद आहे. याला ज्यांनी विरोध केला अशा अखिल वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना स्थानबद्ध करून सरकारने एक प्रकारे वारकरी संप्रदायिकांचा अपमान केला आहे. तरी कराडकर यांची त्वरित मुक्तता करून मंदिरावरील तसेच वारकरी संप्रदायांच्या धार्मिक कार्यक्रमावरील निर्बंध त्वरित मागे घेऊन सांप्रदायिक कार्यक्रमास परवानगी द्यावी अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. श्रावण महाराज आहिरे, ह.भ.प. भरत महाराज मिटके, लहुदास महाराज अहिरे, शिवाजी ठाकरे, सुदाम दाणे, विवेक नांदुर्डीकर व लक्ष्मण दिवटे, कल्पना ठाकरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

(फोटो १४ वारकरी) वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. बंडातात्या कऱ्हाडकर यांची मुक्तता करावी या मागणीचे निवेदन तहसीलदार डी.के. धांडे यांना देताना ह.भ.प. भरत महाराज मिटके. समवेत ह.भ.प. लहुदास अहिरे, शिवाजी ठाकरे, सुदाम दाणे, विवेक नांदुर्डीकर, लक्ष्मण दिवटे आदी.

Web Title: H.B.P. Rebel Karhadkar should be released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.