एच.डी.एफ.सी.बँकेचे एटीएम फोडून १३ लाखांची रक्कम लुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 02:57 PM2018-05-31T14:57:12+5:302018-05-31T14:57:12+5:30
येवला (नाशिक) : येवला पाटोदा रस्त्यावरील एसएनडी कॅम्पस मधील एच. डी. एफ. सी.बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडुन १३ लाख ३७ हजार ३०० रु पयाची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बाभुळगाव शिवारातील एसएनडी महाविद्यालयाच्या परिसरात घडली.
येवला (नाशिक) : येवला पाटोदा रस्त्यावरील एसएनडी कॅम्पस मधील एच. डी. एफ. सी.बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडुन १३ लाख ३७ हजार ३०० रु पयाची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बाभुळगाव शिवारातील एसएनडी महाविद्यालयाच्या परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी येवला शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. येवला पाटोदा रस्त्यावर सुमारे तीन किमी वर एस.एन.डी.शैक्षणकि संकुलात एचडीएफसी बँकेने विदयार्थी व शिक्षक यांच्या सोयीसाठी एटीएम ची व्यवस्था केली आहे.मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास लुटारूंनी एटीएमच्या ज्या भागातून नोटा येतात, ते पॅनल गॅसकटरच्या सहाय्याने तोडुन त्यातील १३ लाख ३७ हजार ३०० रु पयाची रक्कम काढुन चोरटे पसार झाले. बुधवारी सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर बँकेच्या एटीएम कंपनीचे व्यवस्थापक सागर नारायण लोखंडे यांनी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांचे विरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस ठाण्याच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली असुन पुढील तपास सुरु आहे.लाखोंची रोकड असलेल्या या एटीएमध्ये सुरक्षा रक्षकाची नेमणूक नसल्याने बँक प्रशासनाने सुरक्षतेबाबत गांभीर्याने घ्यावे अशी मागणी होत आहे.सध्या शाळा कॉलेजला सुट्टी आहे.याचा फायदा पाळत ठेऊन चोरट्यांनी घेतल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.मात्र सुट्टीत मोठा भरणा भरल्याचा गैर फायदा लुटारूंनी घेतल्याचे स्पष्ट होत आहे. (३१ येवला १,२,३)