जानोरीतील पुरातन श्री दत्त मूर्तीच्या सौंदर्यात ‘त्यांनी’ घातली भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 08:44 PM2020-12-28T20:44:53+5:302020-12-29T00:08:54+5:30

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील भवानीपेठेत कुमार वयातील शिल्प प्रतिमा असलेल्या शंभर वर्षांपूर्वीच्या श्री दत्त मूर्तीची होणारी झीज आणि मूर्तीला आलेले मालिन्य दूर करत, विशिष्ट अशी रासायनिक प्रक्रिया करून तिचे जतन करण्यात आले आहे. रासायनिक प्रक्रियेद्वारे मूर्तीला नवीनतम रूप बहाल करण्याचे हे अवघड शिवधनुष्य नाशिकच्या मिट्टी फाउंडेशनचे संस्थापक व मूर्तिकार मयूर मोरे यांनी पेलले आहे.

He added to the beauty of the ancient idol of Shri Dutt in Janori | जानोरीतील पुरातन श्री दत्त मूर्तीच्या सौंदर्यात ‘त्यांनी’ घातली भर

जानोरीतील पुरातन श्री दत्त मूर्तीच्या सौंदर्यात ‘त्यांनी’ घातली भर

Next
ठळक मुद्देजागृत देवस्थान : मूर्तिकार मोरे यांच्या मिट्टी फाउंडेशनने पेलले आव्हान

जानोरी गावातील भवानी पेठ येथील कुलकर्णी वाड्यामध्ये जागृत असे श्री दत्त मंदिर आहे. १९२० मध्ये या मंदिराच्या उभारणीला सुरुवात होऊन १० डिसेंबर, १९२१ मध्ये हे मंदिर भाविकांसाठी खुले झाले. तशी लिखित नोंद मंदिराच्या भिंतीवर त्याची साक्ष देते. श्री दत्त मूर्ती शंभर वर्षांपूर्वीची असल्याने तिला मालिन्य आले होते व मूर्तीची सूक्ष्म स्वरूपात होत असलेली झीज थांबविण्याचे मोठे आव्हान होते. हे आव्हान मिट्टी फाउंडेशनचे संस्थापक व कला संवर्धन तज्ज्ञ मयूर मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वीकारले. त्यांनी रासायनिक संवर्धन प्रक्रिया करून मूर्तीत नवचैतन्य आणले. मूर्तीचा बांधा आणि हात व पाय नाजूक असल्याने बऱ्याच अडचणी येत होत्या, परंतु हे आव्हानात्मक काम पूर्ण करण्याचा मोरे यांनी संकल्प केला आणि तो तडीस नेला. मूर्तीची मालिन्यता दूर करण्यासाठी पारंपरिक पद्धतीसह रासायनिक संवर्धन प्रक्रिया करून त्यावर ह्यरिव्हरसेबलह्ण प्रकाराने मूर्तीवरील दागिन्यांना २४ कॅरेटचे गोल्ड फॉयलिंग व रंगकाम करून सौंदर्यीकरण करण्यात आले. एकूण १३ दिवस अथक प्रयत्न करत, हे आव्हानात्मक काम मोरे व कुटुंबीयांनी पूर्ण केले. या कामी त्यांना शिल्पकार श्रेयस गर्गे यांचे मार्गदर्शन लाभले. अत्यंत जागृत अशी ख्याती असलेल्या या श्री दत्त मंदिराची देखभाल गोविंद कुलकर्णी , नीलेश कुलकर्णी, तसेच ॲड.संतोष कुलकर्णी यांच्यासह सर्व कुटुंबीय हे मनोभावे करत आहेत.
कुमार वयातील शिल्प प्रतिमा
मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही श्रीगुरुदत्तात्रेय यांच्या कुमार वयातील शिल्प प्रतिमा आहे असून, भिक्षेसाठी झोळी नसलेली व हातामध्ये रुद्राक्ष माळ धारण केलेली ही मनोहारी मूर्ती आहे. मंदिरात विशेष करून दत्तजयंती, श्री गुरुपौर्णिमा यासह अन्य सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. राज्यातील इतर भागाप्रमाणे येथे अक्षय तृतीयेच्या दिवशी वार्षिक बोहोड्याचा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.
राष्ट्रीय पातळीवर पुरातत्त्व संस्कृती संवर्धन या विषयावर इन्टॅक्ट ही संस्था प्रभावीपणे कार्य करते आहे. मिट्टी फाउंडेशन ही या संस्थेसोबत कार्यरत असल्याने येणाऱ्या काळात या विषयावर भरीव कामगिरी करण्याचा मानस आहे. शहर व जिल्ह्यातील अनेक प्राचीन धार्मिकदृष्ट्या महत्त्व असलेले मूर्ती व मंदिराचे संवर्धन होणे अत्यंत गरजेचे आहे.
- मयूर मोरे, शिल्पकार

Web Title: He added to the beauty of the ancient idol of Shri Dutt in Janori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.