रसाळ भक्तिगीतात श्रोते झाले तल्लीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 01:08 AM2019-04-24T01:08:19+5:302019-04-24T01:08:40+5:30

काळाराम संस्थानच्या वतीने आयोजित वासंतिक नवरात्र महोत्सवात काळाराम मंदिर येथे स्वरसंगम प्रस्तुत रेखा महाजन यांच्या भक्ती संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रसाळ भक्तिगीतात श्रोते तल्लीन झाले होते.

 He became a devotee of silent devotion | रसाळ भक्तिगीतात श्रोते झाले तल्लीन

रसाळ भक्तिगीतात श्रोते झाले तल्लीन

googlenewsNext

नाशिक : काळाराम संस्थानच्या वतीने आयोजित वासंतिक नवरात्र महोत्सवात काळाराम मंदिर येथे स्वरसंगम प्रस्तुत रेखा महाजन यांच्या भक्ती संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रसाळ भक्तिगीतात श्रोते तल्लीन झाले होते.
काळाराम संस्थान पदाधिकाऱ्यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ईशस्तवनाने कार्यक्र माची सुरु वात करण्यात आली. विसरू नको श्रीरामा मला.., विजयी पताका श्रीरामाची.., निळ्या आभाळी कातरवेळी.., सांज ये गोकुळी.., रु णुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा.., बाई मी विकत घेतला.., रामा रघु नंदना.., सत्यम शिवम सुंदरम... अशी एकाहून एक सरस भक्तिगीते रेखा महाजन यांनी सादर केली. त्याचबरोबर घनश्याम सुंदरा... ही भूपाळी, उजळून आलं आभाळ बी.. हे युगल गीत सादर केले. संजय किल्लेदार यांनी स्वयंवर झाले सीतेचे, कुश-लव रामायण गाती, तसेच संदीप बोराडे यांनी रामजी की निकली सवारी, शिर्डीवाले साईबाबा, तुला खांद्यावर घेईन ही गीते सादर केली. तर सुखदा हिने गवळण व सप्तशृंगी देवी माझी.. ही गाणी सादर केली. साथसंगत नरेंद जाधव, महेंद्र फुलफगर, आनंद शहाणे यांनी दिली, तर निवेदन धनेश जोशी यांनी केले. ध्वनी सचिन तिडके यांचे होते. या भक्तिमय कार्यक्र मास मान्यवर व श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title:  He became a devotee of silent devotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.