मोटारसायकल खरेदी करायला आला अन पळवून घेऊन गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 02:16 PM2019-01-13T14:16:07+5:302019-01-13T14:18:44+5:30
पाथर्डी फाटा परिसरातील शिवाजी पुतळया जवळून मोटार सायकल खरेदीसाठी पाहायला आलेल्या तरुणांने ट्रायल घेण्याच्या बहाण्याने मोटार सायकलच पळवून नेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने ऑनवाईन विक्री संकेतस्थळावर दुचाकी विक्रीची जाहिरात टाकल्यावर संशयिताने त्याच्याशी संपर्क साधला. त्यांनी पाथर्डी फाटा परिसरात भेटू दुचीकी बघण्याचे ठरविले. यावेळी दुचाकीची ट्रायल घेण्यासाठी जातो असे सांगून गेल्यानंत संबधित तरुण परतलाच नसल्याने या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञाता संशयिता विरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : पाथर्डी फाटा परिसरातील शिवाजी पुतळया जवळून मोटार सायकल खरेदीसाठी पाहायला आलेल्या तरुणांने ट्रायल घेण्याच्या बहाण्याने मोटार सायकलच पळवून नेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने ऑनवाईन विक्री संकेतस्थळावर दुचाकी विक्रीची जाहिरात टाकल्यावर संशयिताने त्याच्याशी संपर्क साधला. त्यांनी पाथर्डी फाटा परिसरात भेटू दुचीकी बघण्याचे ठरविले. यावेळी दुचाकीची ट्रायल घेण्यासाठी जातो असे सांगून गेल्यानंत संबधित तरुण परतलाच नसल्याने या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञाता संशयिता विरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवलाली कॅ म्प येथील कॅन्टोमेंट रुग्णालयाच्या परिसरातील रहिलासी हिमांशू विजय शर्मा (२३) याने दिलेल्या फिर्यादीनुसार नुसार त्याने३५ हजार रुपयांची एमएच ०१ बीई ६३७४ क्रमांकाची स्पोर्ट बाईक विक्री करण्यासाठी आॅनलाईन संकेतस्थळावर जाहीरात केली होती. ही जाहिरात पाहून संशयिताने हिमांशू शर्मासोबत ९४९९७९१७०० या दुरध्वनी क्रमांकावरून संपर्क साधत मोटारसायकल खरेदीची इच्छा व्यक्त केली. यावेळी संशयिताने स्वत:चे नाव सागर साठे असल्याचे सांगत शर्माकडे दुचाकी बघण्याची इच्छा व्यक्त केली. दोघांच्या या संभाषणानंतर संशयिताने मंगळवारी (दि. ८) दुपारी ३ वाजता हिमांशू शर्मा याला दुचाकीसोबत पाथर्डी फाटा येथील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ बोलावून घेतले. यावेळी या संशयिताने मोटारसायकल बघून झाल्यानंतर शर्मा याच्याकडे गाडी चालवून पाहण्याची इच्छा व्यक्त करीत परिसरात गाडी चालवून पाहायला सुरुवात केली. यावेळी गाडी चालवणू बघताना काही अंतरावर गेल्यानंतर संशयित परत आलाच नाही. त्यामुळे हिमांशू शर्मा यांनी परिसरात त्याची चौकशी केल्यानंतर शनिवारी (दि. १२) याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.