कमरेला पिस्तुल अन‌् हातात कोयते घेऊन घरात शिरले अन‌् सहा हजारांची रोकड लुटून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 02:44 PM2020-10-27T14:44:56+5:302020-10-27T14:49:43+5:30

महिलांना शिवीगाळ व मारहाण करत घरातील आरसा व इतर वस्तूंची तोडफोड करून कपाटात ठेवलेले सहा हजार रुपयांची रोकड लुटल्याप्रकरणी जाधव यांनी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली होती.

He entered the house with a pistol in his hand and looted Rs 6,000 in cash | कमरेला पिस्तुल अन‌् हातात कोयते घेऊन घरात शिरले अन‌् सहा हजारांची रोकड लुटून गेले

कमरेला पिस्तुल अन‌् हातात कोयते घेऊन घरात शिरले अन‌् सहा हजारांची रोकड लुटून गेले

googlenewsNext
ठळक मुद्देभरदिवसा घडला प्रकार, महिलेला मारहाणमहिलेवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न

पंचवटी : शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारांवरील खाकीचा वचक कमी होताना दिसत आहे. भरदिवसा सराईत गुंडांची टोळी कमरेला पिस्तुल अन‌् हातात धारधार कोयते घेत एका घरात शिरली आणि महिलेला शिवीगाळ व मारहाण करत घरातील सहा हजारांची रोकड घेऊन पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गुन्ह्याचा वेगाने तपास करत पंचवटी पोलिसांना टोळीला गजाआड करण्यास यश आले.

सोमवारी (दि.२६) भरदिवसा फुलेनगर येथील रहिवाशी सोनी संतोष जाधव यांच्या घरात घुसून महिलांना शिवीगाळ व मारहाण करत घरातील आरसा व इतर वस्तूंची तोडफोड करून कपाटात ठेवलेले सहा हजार रुपयांची रोकड लुटल्याप्रकरणी जाधव यांनी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली होती. यानुसार अज्ञात गुंडांच्या टोळीविरुध्द पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आणि तपासचक्रे वेगाने फिरविली असता संशयित सराईत गुन्हेगार प्रशांत अशोक जाधव, योगेश प्रल्हाद लांबाडे, रोहन प्रभाकर निकम, अंकुश भूषण सोनवणे, मयूर वाघमारे व जतिन दिलीप साळुंखे यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या सर्व सराईत गुन्हेगारांवर
शहरातील विविध पोलिस ठाण्यांत मारहाण, चोरी, जबरी लूट, दरोडे यांसारखे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

महिलेवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न
सोमवारी सकाळी सराईत गुंडांनी कमरेला बंदूक लावून व हातात धारदार कोयते घेऊन घरात बळजबरीने प्रवेश करत घरात असलेल्या शांता गुंजाळ, गीता गुंजाळ, मेघा जाधव या महिलांना शिवीगाळ व मारहाण केली तसेच फिर्यादी सोनी जाधव यांच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी जाधव यांनी वार चुकवला असता घरातील आरसा फुटला यावेळी फिर्यादीची मावशी राजश्री गुंजाळ या मदतीसाठी आल्यात या संशयितांनी त्यांना शस्त्राचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देत परिसरात दहशत निर्माण करून दुचाकीवरून पळ काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: He entered the house with a pistol in his hand and looted Rs 6,000 in cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.