कंटेनरच्या चाकाखाली येऊन दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 10:41 PM2021-11-10T22:41:03+5:302021-11-10T22:41:29+5:30

सिन्नर : सिन्नर-घोटी मार्गावर घोरवड घाटात पिकअपने कार व दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार रस्त्यावर पडला. त्याच सुमारास भरधाव जाणाऱ्या कंटेनरचे मागील चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

He fell under the wheel of the container and killed the cyclist | कंटेनरच्या चाकाखाली येऊन दुचाकीस्वार ठार

कंटेनरच्या चाकाखाली येऊन दुचाकीस्वार ठार

Next
ठळक मुद्देघोरवड घाटात अपघात : एक जण गंभीर जखमी

सिन्नर : सिन्नर-घोटी मार्गावर घोरवड घाटात पिकअपने कार व दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार रस्त्यावर पडला. त्याच सुमारास भरधाव जाणाऱ्या कंटेनरचे मागील चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

बुधवारी (दि. १०) सकाळी साडेनऊच्या सुमारास सदर अपघात झाला. भास्कर हरिभाऊ बोराडे (५३, रा. गुंजाळवाडी, कर्जुले पठार, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे मृत व्यक्तीचे नाव असून सुनील नानाभाऊ बोराडे (३६, रा. पिंपळगाव देपा, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) हे जखमी झाले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिकअप जीप (क्रमांक एमएच १५ इजी २९०१) ही घोटीकडे भरधाव वेगात जात असताना पुढे चालणाऱ्या कारला (क्रमांक एमएच १५ एफटी २०९२) तिने पाठीमागून ठोस मारली व पुन्हा कारच्या पुढे चाललेल्या दुचाकीलाही (क्रमांक एचएच १२ जेडब्ल्यु ९५६९) ठोस दिली. त्यामुळे भास्कर बोराडे हे रस्त्यावर पडले. त्याच सुमारास घोटीकडून येणाऱ्या कंटेनरचे (क्रमांक एमएच ४६ बीएम १८१४) मागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. सुनील बोराडे हेदेखील जखमी झाले आहेत. अपघातानंतर पिकअप चालक फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी रामदास त्र्यंबक खाडे यांच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
फोटो - १० घोरवड ॲक्सिडेंट
सिन्नर- घोटी रस्त्यावर घोरवड घाटातील अपघातग्रस्त वाहने.

Web Title: He fell under the wheel of the container and killed the cyclist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.