सामाजिक जाणिवेतून स्वखर्चाने दोन वेळचे पुरविले भोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 02:07 PM2019-08-05T14:07:28+5:302019-08-05T14:12:53+5:30

गणेशवाडी मनपा शाळेत स्थलांतरित केले खरे पण सकाळपासून पोटात अन्नाचा कणही नाही अशा अवस्थेत बसलेल्या त्या नागरिकांच्या मदतीसाठी अखेर पंचवटीकरांचे हात सरसावले सामाजिक जाणविेतून काही नागरिकांनी गंगा घाटावरील स्थलांतरितांना सकाळ सायंकाळ अशा दोनवेळच्या भोजनाची व्यवस्था करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.

He provided two meals nashik flood, for self-interest through social awareness | सामाजिक जाणिवेतून स्वखर्चाने दोन वेळचे पुरविले भोजन

सामाजिक जाणिवेतून स्वखर्चाने दोन वेळचे पुरविले भोजन

Next
ठळक मुद्देगंगाघाटावरील स्थलांतरितांना मदत संसारोपयोगी व जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान गंगाघाटावर अनेक बेघर दिवसभर मोलमजुरी व रात्री गंगाघाट हेच त्यांचे घर

पंचवटी : रविवारी सकाळी गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याखाली झोपड्या पाल वाहून गेल्याने पुराने भयभीत होऊन कधी झाडाखाली तर कधी भाजीमंडईत सहारा घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर पुराचे पाणी अधिक वाढल्याने उघड्यावर आलेल्या नागरिकांना महापालिका प्रशासनाने तात्पुरते गणेशवाडी मनपा शाळेत स्थलांतरित केले खरे पण सकाळपासून पोटात अन्नाचा कणही नाही अशा अवस्थेत बसलेल्या त्या नागरिकांच्या मदतीसाठी अखेर पंचवटीकरांचे हात सरसावले सामाजिक जाणविेतून काही नागरिकांनी गंगा घाटावरील स्थलांतरितांना सकाळ सायंकाळ अशा दोनवेळच्या भोजनाची व्यवस्था करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
गोदावरीला आलेल्या पुराच्या पाण्याने नदीकाठ परिसरात राहणार्या सर्वच नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते गोदावरीच्या पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका नदीकाठ भागात राहणार्या मोलमजुरी करणार्या नागरिकांना बसला.
गाडगे महाराज पुलालगत असलेल्या मरीमाता झोपडपट्टी व अमरधाम नजीक झोपडपट्टीत पुराचे पाणी गेल्याने अनेक नागरिकांची तारांबळ उडाली होती महापालिका प्रशासनाने त्या नागरिकांना सुखरूप पणे गणेश वाडी मनपा शाळेत स्थलांतरित केले होते.
गंगाघाटावर अनेक बेघर राहत असून दिवसभर मोलमजुरी व रात्री गंगाघाट हेच त्यांचे घर अशीच दिनचर्या चालते मात्र रविवारी गोदावरीला आलेल्या पुरानंतर सगळ्यांचीच पळापळ झाली राहायला जागा मिळाली मात्र पोटात अन्नाचा कणही नाही त्यामुळे काय करायचे असा विचार करत असतानाच पंचवटीतील सुनील धुमाळ, मयूर शिंदे, चेतन गरकळ या तिघा तरु णांनी स्वखर्चाने सुमारे 400 ते 500 बेघर झोपडपट्टीत राहणार्या स्थलांतरित नागरिकांना सकाळ सायंकाळ भोजन व्यवस्था करून दिली.
रामवाडी परिसरात तळेनगर येथे नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी गेल्याने त्यांच्या संसारोपयोगी व जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एक सामाजिक बांधिलकी म्हणून प्रभागाच्या नगरसेवक श्रीमती भिकुबाई बागुल, माजी नगरसेवक संजय बागुल यांनी सुमारे 300 ते 400 नागरिकांना दुपारी भोजनाची व्यवस्था करत सामाजिक एकतेचे दर्शन घडविले.

 

Web Title: He provided two meals nashik flood, for self-interest through social awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.