दातृत्वाच्या सायकलींनी त्यांनी गाठली ‘मंझिल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 10:42 PM2020-05-08T22:42:36+5:302020-05-09T00:08:45+5:30

नाशिकरोड : साहाब, आप हमारे लिये किसी भगवानसे कम नहीं हो, आपने हमें साईकल नहीं, इस लॉकडाउन के समय जैसे मानो प्लेनही दे दिया हों, हम जिंदगीभर आपके एहसानमंद रहेंगे..., अशा भावना मध्य प्रदेशमधील इंदोर सायकलींद्वारे गाठणाऱ्या त्या सहा मजूर युवकांनी व्यक्त केल्या.

 He reached the 'destination' with charity bicycles | दातृत्वाच्या सायकलींनी त्यांनी गाठली ‘मंझिल’

दातृत्वाच्या सायकलींनी त्यांनी गाठली ‘मंझिल’

Next

नाशिकरोड : साहाब, आप हमारे लिये किसी भगवानसे कम नहीं हो, आपने हमें साईकल नहीं, इस लॉकडाउन के समय जैसे मानो प्लेनही दे दिया हों, हम जिंदगीभर आपके एहसानमंद रहेंगे..., अशा भावना मध्य प्रदेशमधील इंदोर सायकलींद्वारे गाठणाऱ्या त्या सहा मजूर युवकांनी व्यक्त केल्या.
पुण्याहून नाशिकमार्गे मध्य प्रदेशमधील कटनी जिल्ह्यात घरी पायी जाण्यास निघालेल्या युवकांना नाशिकरोड येथील सामाजिक कार्यकर्ते फ्रान्सीस वाघमारे यांनी विद्यार्थी व त्यांच्या काही मित्रांच्या मदतीने सायकली उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे मजुरांच्या नाशिक ते मध्य प्रदेश या प्रवासाला चाकांची गती अखेर लाभली. हे मजूर पुण्याहून सुमारे दोनशे ते अडीचशे किलोमीटरचा प्रवास करत नाशिकरोडला आले होते.  नाशिकरोडचे समाजसेवक फ्रान्सिस वाघमारे हे नाशिकला सायकलवर जात असताना नाशिक-पुणे मार्गावरील नासर्डी पुलाजवळ पायी चाललेले सहा युवक पाच दिवसांपूर्वी त्यांना दिसल्यानंतर त्यांना मदतीचा हात पुढे केला.

Web Title:  He reached the 'destination' with charity bicycles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक