शतपावली करणाऱ्या वृद्धेची मोहनमाळ हिसकावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2022 01:19 AM2022-06-20T01:19:09+5:302022-06-20T01:19:31+5:30
चेतनानगर परिसरात आपल्या मुलीकडे आलेली वृद्ध महिला शतपावलीसाठी घराबाहेर पडल्या असता दुचाकीवर आलेल्या तिघांपैकी एकाने खाली उतरून त्यांच्याजवळ जात गळ्यातील सोन्याची चेन व मोहनमाळ हिसकावली. वृद्धेने प्रतिकार करत हातांनी सोनसाखळी घट्ट धरून ठेवत चोरऽऽ चोरऽऽ अशी आरडाओरड केली. त्यामुळे चोरट्यांच्या जितके सोने हाती लागले ते घेऊन धूम ठोकली. या जबरी चोरीत वृद्धेचे पाच तोळ्यांपैकी सोळा ग्रॅमचे सोने चोरीला गेले. ही घटना शनिवारी (दि.१८) रात्री नऊ वाजेच्या सुमारास चेतनानगरमध्ये घडली.
इंदिरानगर : चेतनानगर परिसरात आपल्या मुलीकडे आलेली वृद्ध महिला शतपावलीसाठी घराबाहेर पडल्या असता दुचाकीवर आलेल्या तिघांपैकी एकाने खाली उतरून त्यांच्याजवळ जात गळ्यातील सोन्याची चेन व मोहनमाळ हिसकावली. वृद्धेने प्रतिकार करत हातांनी सोनसाखळी घट्ट धरून ठेवत चोरऽऽ चोरऽऽ अशी आरडाओरड केली. त्यामुळे चोरट्यांच्या जितके सोने हाती लागले ते घेऊन धूम ठोकली. या जबरी चोरीत वृद्धेचे पाच तोळ्यांपैकी सोळा ग्रॅमचे सोने चोरीला गेले. ही घटना शनिवारी (दि.१८) रात्री नऊ वाजेच्या सुमारास चेतनानगरमध्ये घडली.
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरीच्या घटना सुरूच आहेत. पीडित फिर्यादी शुभदा प्रभाकर कुलकर्णी (७२) या त्यांची मुलगी रूपाली जोशी (रमाई बंगला, आयोध्यानगर, चेतनानगर) यांच्याकडे भेटण्यासाठी आल्या आहेत. शनिवार रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास जेवण झाल्यानंतर कुलकर्णी या मुलीची सासू रोहिणी जोशी यांच्याबरोबर श्रीराम मंदिरात दर्शन घेऊन परत आल्या. यानंतर कॉलनीत त्या शतपावली करत होत्या. त्यावेळी पाठीमागून काळ्या रंगाच्या दुचाकीवरून तिघे सोनसाखळी चोर आले. त्यांच्यापैकी पाठीमागे बसलेला एक चोरटा खाली उतरला व कुलकर्णी यांच्याजवळ आला आणि त्यांच्या गळ्यातील दोन पदरी सोन्याची चेन व मोहनमाळ हिसकावली; मात्र त्या वेळीच सावध झाल्याने हाताने त्यांनी सोन्याची मोहनमाळ घट्ट धरून ठेवली. यामुळे चोरट्यांच्या हाती सोळा ग्रॅमचा तुकडा लागला, बाकी उरलेले सोने कुलकर्णी यांच्या गळ्यातच राहिल्यामुळे ते शाबूत राहिले. त्यामुळे सुमारे ४७ हजार रुपयांची सोनसाखळी चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.