‘त्यांनी’ घेतला पर्यावरण संवर्धनाचा वसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 08:02 PM2018-08-30T20:02:23+5:302018-08-30T20:03:05+5:30
सह्याद्रीच्या पर्वत रांगातील पवित्र पहाडांना, ज्यांची नावे आहेत अशा ब्रह्मगिरी व गंगाद्वार याठिकाणी हजारो औषधी वनस्पती आहेत. अशा ब्रह्मगिरी संवर्धनासाठी आयपीएल ग्रुपने पुढाकार घेतला असून त्यादृष्टीने त्यांनी कामकाजास प्रारंभ केला आहे.
माजी नगराध्यक्ष ललित लोहगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हरित ब्रह्मगिरी ग्रुपची स्थापना करून त्यांच्या समवेत श्याम गोसावी, रमेश झोले, प्रकाश दिवे, खंडू भोये, दिनेश सूर्यवंशी, गणेश गुरव, सचिन कदम आदींसह आयपीएल ग्रुप पर्यावरणाचा समतोल राखण्याचे काम करीत आहेत. त्यांनी आयपीएल ग्रुपच्या माध्यमातून आपला व्यवसाय नोकरी सांभाळून ब्रम्हगिरीच्या संवर्धनावर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये शैलेश गायकवाड, विजय नाईकवाडी, दत्ता मधे, अमोल दोंदे, अमोल पगारे, प्रशांत गंगापुत्र, प्रकाश रणमाळे, धर्मा झोले, संजय नाईकवाडी, बाळू देव, बाजीराव धात्रक, नितीन शिंदे, हरिष झोले, अॅड. पराग दीक्षित, श्याम भुतडा, नीलेश भालेराव व भगवान आचारी आदी सदस्य कार्यरत आहेत. दिवसभर झाडांना ओटे तर काही झाडांभोवती उंचवटा केला जात आहे. जेणे करून खड्ड्यांमध्ये पाणी साचेल, माळरानावर खड्ड्यात पाणी साचल्यामुळे पाणी अडकून जेणेकरून खाली पाणी वाहणार नाही. गावात पूर परिस्थिती निर्माण होणार नाही, अशा पद्धतीने या ग्रुपचे काम चालू आहे.