मुंढेंचा धसका : फायलींवर स्वाक्षरीसाठी पायधूळ नगरसेवकांचा ‘धावपळ’वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 01:51 AM2018-02-09T01:51:27+5:302018-02-09T01:52:00+5:30
नाशिक : महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे हे शुक्रवारी (दि.९) पदाची सूत्रे हाती घेणार असल्याने गुरुवारी (दि.८) दिवसभर पदाधिकाºयांसह नगरसेवकांची प्रलंबित फायलींवर मावळते आयुक्त अभिषेक कृष्ण यांची स्वाक्षरी घेण्यासाठी धावपळ दिसून आली.
नाशिक : महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे हे शुक्रवारी (दि.९) पदाची सूत्रे हाती घेणार असल्याने गुरुवारी (दि.८) दिवसभर पदाधिकाºयांसह नगरसेवकांची प्रलंबित फायलींवर मावळते आयुक्त अभिषेक कृष्ण यांची स्वाक्षरी घेण्यासाठी धावपळ दिसून आली. मात्र, आयुक्तांनी स्वाक्षºया करण्याचे टाळल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अनेकांना चिंताक्रांत चेहºयांनी मुख्यालयातून माघारी परतावे लागल्याची चर्चा आहे. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांची मुंबई एमआयडीसी येथे सह मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झालेली आहे तर त्यांच्या जागेवर बदलून आलेले पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे हे शुक्रवारी (दि.९) सकाळी ११ वाजेच्या सुमारास आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. त्यामुळे मावळते आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी गुरुवारी (दि.८) नेहमीप्रमाणे महापालिका मुख्यालयात येत आपल्या नियोजित कामांवर भर दिला. यावेळी, सत्ताधाºयांसह विरोधी पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक तसेच अधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिकांनीही आयुक्तांची भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. एकीकडे आयुक्तांची भेट घेण्याचे सत्र पार पडत असतानाच आयुक्तांकडे प्रलंबित असलेल्या फायलींवर स्वाक्षºया होण्यासाठी अनेक नगरसेवकांची धावपळ सुरू होती. काही नगरसेवक खातेप्रमुखांसह अतिरिक्त आयुक्तांकडे चकरा मारत प्रलंबित फायलींचा निपटारा करण्यासाठी आग्रह धरताना दिसून येत होते. नवीन आयुक्त आल्यास प्रलंबित फायलींचा प्रवास पुन्हा लांबण्याची भीती असल्याने बव्हंशी नगरसेवकांनी मुख्यालयात गुरुवारी हजेरी लावली. परंतु, आयुक्तांनी बºयाच फायलींवर स्वाक्षºया केल्या नसल्याचे समजते. त्यामुळे, संबंधित नगरसेवकांच्या पोटात गोळा उठला आहे.