जुलैमध्ये शाळा भरवण्यास मुख्याध्यापकांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 10:27 PM2020-07-04T22:27:05+5:302020-07-04T23:22:03+5:30

आॅनलाइन शिक्षण तालुका व जिल्ह्यात बाहेरून येणारे शिक्षक, मुख्याध्यापकांची आरोग्य तपासणी करावी, शाळा सुरू करण्याबाबत पालकांनी घाई करू नये यासाठी त्यांचे प्रबोधन करावे, विद्यार्थ्यांचे आॅनलाइन शिक्षण सुरू ठेवावे, ग्रंथालयातील पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच करावी आदी सूचना साळुंखे यांनी मुख्याध्यापकांना केल्या. जुलै महिन्यात वृक्षारोपण उपक्रम राबवताना शारीरिक अंतर राखून व गर्दी न करता कार्यक्रम राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या.

The headmaster refuses to fill the school in July | जुलैमध्ये शाळा भरवण्यास मुख्याध्यापकांचा नकार

सिन्नर येथे गटशिक्षणाधिकारी साळुंखे यांना निवेदन देतांना मुख्याध्यापक संघाचे सदस्य़.

Next
ठळक मुद्देसिन्नर येथे सहविचार सभेनंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांना साकडे

सिन्नर : कोरोनाचा संसर्ग फैलावत असून, ग्रामीण भागातही जोमाने प्रसार होत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे जुलै महिन्यात मुख्याध्यापकांना शाळा भरवण्याची सक्ती करू नये, अशी मागणी मुख्याध्यापक संघाचे जिल्हा सचिव एस. बी. देशमुख यांनी केली. सिन्नर येथे झालेल्या शिक्षणाधिकारी व मुख्याध्यापक सहविचार सभेत ही मागणी करण्यात आली.
शालेय शिक्षण समित्यांच्या तातडीने बैठका घेऊन त्याचा अहवाल पाठवावा, अशी सूचना गटशिक्षणाधिकारी साळुंके यांनी केली. शासनाचा सक्तीचा आदेश येईपर्यंत शाळा सुरू करू नये, मुख्याध्यापकांनी शालेय शिक्षण समिती, ग्रामसेवक, विद्यार्थी-पालक यांच्याशी संपर्क साधावा, शाळा निर्जंतुक करावी, शालेय पातळीवर आरोग्य तपासणीचे नियोजन करावे, आॅनलाइन शिक्षणापासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत ती पीपीटी पोहोच करावी, त्यासाठी गावातील विविध दानशूरांची मदत घ्यावी, असे आवाहन साळुंखे यांनी केले. दरम्यान, सद्यस्थितीत शाळा भरवू नये या मागणीचे निवेदन मुख्याध्यापक संघातर्फे गटशिक्षणाधिकारी साळुंखे यांना देण्यात आले.
गटशिक्षणाधिकारी मंजूषा साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेस मुख्याध्यापक बी. आर. कहांडळ, आर. बी. एरंडे, बी. व्ही. पांडे, एम. डी. काळे, एस. बी. शिरसाठ, आर. इ. लोंढे, एस. जी. सोनवणे, ए. डब्ल्यू. पवार, बी. बी. पाटील, डी. पी. कानडी, एस. एस. कांगणे, बी.के. फटांगरे, आर. एल. चिने आदी उपस्थित होते.

Web Title: The headmaster refuses to fill the school in July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.