सेतू अभियानाचे काम सांगितल्यानेमुख्याध्यापकांना केली मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2021 11:01 PM2021-08-04T23:01:38+5:302021-08-04T23:02:06+5:30
कळवण : शिक्षण सेतू अभियानाचे काम मुख्याध्यापकांनी सांगितल्याचे त्याचा राग आल्याने विसापूर येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षक अनिल देसले यांनी मुख्याध्यापक यांना मारहाण केली केल्याची घटना घडली असून या प्रकरणी शासकीय कामात अडचण निर्माण करणे व मुख्याध्यापकांना मारहाण केल्याच्या कारणावरून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांनी देसले यांना निलंबित केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कळवण तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा विसापूर येथील मुख्याध्यापक यांनी याबाबत एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्पाधिकारी कळवण तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रारीत केली आहे. त्यात नमूद केले आहे की, शासनाच्या निर्देशानुसार नव्याने अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेल्या शिक्षण सेतू अभियानाचे सर्व शिक्षक वर्गात समसमान वाटप करण्यात आले आहे.
प्राथमिक शिक्षक अनिल देसले यांनाही सेतू अभियानचे काम देण्यात आले आहे. ते त्यांच्या कामात टाळाटाळ करीत असल्याने त्यांना हे काम करण्यास सांगितले असता त्यांनी अरेरावीची भाषा वापरून हे काम माझे नसून मी ते करणार नाही, असे सांगत मुख्याध्यापकांना शाळेत शासकीय कामकाज करीत असताना लाथा बुक्यांनी मारहाण केली तसेच दोनवेळा टेबल लोटून दाबून धरले इतर सहकारी शिक्षकांनी त्यांना पकडून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी इतर सहकाऱ्यांना मला सोडा आज मी याला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. या प्रकरणी मुख्याध्यापकांनी या शिक्षकावर तात्काळ कारवाई करावी अशी लेखी स्वरूपात तक्रार केली आहे.
या संदर्भात प्रकल्प अधिकारी मीना यांनी तक्रारीची दखल घेऊन प्राथमिक शिक्षक अनिल देसले प्रथमदर्शनी कर्तव्यात कसूर केल्याचे आढल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. शिवाय त्यांना शासकीय आश्रमशाळा, भोरमाळ, ता. सुरगाणा हे मुख्यालय देण्यात आले असून मुख्यालय सोडण्यापूर्वी मुख्याध्यापकांची परवानगी घेणे बंधनकारक केले असल्याचे समजते.
कोट...
माझ्या सेवानिवृत्तीला अवघे ५६ दिवस बाकी आहेत . त्यामुळे शिक्षक देसले पासूनमाझ्या जीवितास धोका आहे. त्यांनी मारहाण केल्याने माझ्या डोळ्यास इजा झाली आहे.
- मुख्याध्यापक