आपल्या विविध मागण्यांसाठी मुख्याध्यापकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 11:52 PM2019-05-29T23:52:03+5:302019-05-30T00:20:40+5:30
नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले.
नाशिकरोड : नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले.
विभागीय आयुक्त कार्यालय आवारातील शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर नाशिक जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने सोमवारी दुपारी आपल्या विविध मागण्यांसाठी घोषणा देत धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व २००५ नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर काही कर्मचाऱ्यांमध्ये जीपीएफ क्रमांक न दिल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे.
धरणे आंदोलनात संघाचे सचिव एस.बी. देशमुख, जिभाऊ शिंदे, एन.डी. बोरसे, ए.जी. गांगुर्डे, एस.टी. रौंदळ, एस.डी. बोराडे, डी.जे. पवार, पी.एफ. चव्हाण, डी.जी. आव्हाड, बी.एम. वाघ, पी.के. सोमवंशी, एम.आर. गांगुर्डे, एस.एन. पाटील, एस. के. कदम, बी.सी. गुरूळे, एस.बी. पाटील, एस.एस. तडवी, ए.पी. निफाडकर
आदि सहभागी झाले होते.
कर्मचाऱ्यांना त्वरित जीपीएफ क्रमांक देण्यात यावा, सहाव्या व सातव्या वेतन आयोगाची फरक बिले व्याजासह जीपीएफ खात्यात जमा करावी, समान नियुक्ती, समान अनुदान, कर्मचाºयांवर दबाव टाकून नवीन पेन्शन खाते उघडण्यास भाग पाडू नये, समान न्याय द्यायला हवा, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहे.