आॅनलाईन प्रवेशासाठी आज मुख्याध्यापकांची बैठक

By admin | Published: June 30, 2017 12:24 AM2017-06-30T00:24:19+5:302017-06-30T00:24:32+5:30

सिडको : मुख्याध्यापक यांची महत्त्वाची बैठक शुक्रवारी (दि. ३०) दुपारी ३ वाजता गंगापूररोड येथील सीएमसीएस कॉलेज येथे आयोजित करण्यात आली आहे.

Headmasters meeting today for online admission | आॅनलाईन प्रवेशासाठी आज मुख्याध्यापकांची बैठक

आॅनलाईन प्रवेशासाठी आज मुख्याध्यापकांची बैठक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सिडको :नाशिकरोड : नाशिक शहरातील ११ वीच्या आॅनलाइन प्रवेशासंदर्भात कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक यांची महत्त्वाची बैठक शुक्रवारी (दि. ३०) दुपारी ३ वाजता गंगापूररोड येथील सीएमसीएस कॉलेज येथे आयोजित करण्यात आली आहे.
बैठकीमध्ये प्रवेश कोट्यातील जागा सरेंडर कधी व कशा कराव्यात, आॅनलाइन केंद्रीय मेरिट लिस्ट जाहीर झाल्यानंतर कॉलेज लॉगइनमधून आॅनलाइन प्रवेश कसे अपडेट करावेत, रिजेक्शन, कॅन्सलेशन कसे करावे, झालेले प्रवेश व रिक्त जागा माहिती कशी द्यावी, प्रवेश देण्यासंदर्भात कॉलेजस्तरावर कोणत्या पद्धतीने नियोजन करावे, कागदपत्र तपासणी कशी करावी, फीबाबत कॉलेज प्रोफाईलमधील विविध लिंकस् कोणत्या व त्याचा वापर कसा करावा याबाबत बैठकीमध्ये मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाणार आहे. बैठकीला कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, उपप्राचार्य, संगणकावर प्रवेश प्रक्रियेचे काम करणारे तंत्रस्नेही कर्मचारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी केले आहे.

Web Title: Headmasters meeting today for online admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.