मुख्यमंत्र्यांना साकडे : येवला तालुक्यातील शिष्टमंडळाची फरक देण्याची मागणी आॅनलाइन मका नोंदणीधारकांचे कोट्यवधींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 01:24 AM2018-03-02T01:24:42+5:302018-03-02T01:24:42+5:30

येवला : शासकीय मका खरेदी बंद झाल्याने तालुक्यातील आॅनलाइन नोंदणी करून मका विक्री न झालेल्या मका उत्पादक शेतकºयांचे कोट्यवधी रुपयाचे प्रचंड नुकसान होणार आहे.

Headquarter to Chief Minister: Demand for the difference of Delegation in Yeola taluka; | मुख्यमंत्र्यांना साकडे : येवला तालुक्यातील शिष्टमंडळाची फरक देण्याची मागणी आॅनलाइन मका नोंदणीधारकांचे कोट्यवधींचे नुकसान

मुख्यमंत्र्यांना साकडे : येवला तालुक्यातील शिष्टमंडळाची फरक देण्याची मागणी आॅनलाइन मका नोंदणीधारकांचे कोट्यवधींचे नुकसान

googlenewsNext
ठळक मुद्देखरेदी-विक्री संघाकडे आॅनलाइन मका नोंदणी तालुक्यातील मका खरेदीचा अंतिम अहवाल

येवला : शासकीय मका खरेदी बंद झाल्याने तालुक्यातील आॅनलाइन नोंदणी करून मका विक्री न झालेल्या मका उत्पादक शेतकºयांचे कोट्यवधी रुपयाचे प्रचंड नुकसान होणार आहे. ज्या शेतकºयांनी येवला तालुका खरेदी-विक्री संघाकडे आॅनलाइन मका नोंदणी केली; परंतु आधारभूत किमतीने मका खरेदी झाली नाही, अशा एक हजार ८५ शेतकºयांना महाराष्ट्र शासनाने येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत मका विक्री करायला लावून सध्याचे बाजारभाव व आधारभूत किंमत यातील फरक शासनाने नोंदणीधारक शेतकºयांना देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस प्रदेश चिटणीस अ‍ॅड. माणिकराव शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आधारभूत किंमत योजनेंतर्गत येवला तालुक्यात खरेदी - विक्री संघामार्फत सुरू असलेल्या शासकीय मका खरेदीसाठी एनर्इंएमएल आॅनलाइन काम करणाºया संस्थेकडून डाटा एन्ट्रीसाठी २० फेब्रुवारीची अंतिम मुदत दिल्याने मार्केटिंग फेडरेशनकडून २१ फेब्रुवारीपासून आॅनलाइन मका खरेदीची नोंद होणार नसल्याने तालुक्यातील मका खरेदीचा अंतिम अहवाल जिल्हा मार्केटिंग आधिकारी नाशिक यांनी मागितल्याने सन २०१७-१८ ची शासकीय मका खरेदी बंद झाली आहे. या निर्णयामुळे सुरुवातीला साठवणूक गुदामाअभावी रखडलेल्या शासकीय मका खरेदी सुरू होताच येवला तालुक्यात खरेदी - विक्र ी संघामार्फत झालेल्या सर्व खरेदीचे विक्र म मोडून यावर्षी २५१७३ क्विंटल मकाची खरेदी झाली आहे.

Web Title: Headquarter to Chief Minister: Demand for the difference of Delegation in Yeola taluka;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी