हेडवर्क्सची कामे सुरू : कंपनीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्षाअखेर मुकणेचे पाणी नाशकात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 01:30 AM2018-03-11T01:30:46+5:302018-03-11T01:30:46+5:30

नाशिक : महापालिकेमार्फत जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत मुकणे धरण पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून, आतापर्यंत ७० टक्के काम झाले आहे.

Headworks launches: Mukesh's death anniversary is likely to increase the company's exposure | हेडवर्क्सची कामे सुरू : कंपनीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्षाअखेर मुकणेचे पाणी नाशकात

हेडवर्क्सची कामे सुरू : कंपनीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्षाअखेर मुकणेचे पाणी नाशकात

googlenewsNext

नाशिक : महापालिकेमार्फत जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत मुकणे धरण पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून, आतापर्यंत ७० टक्के काम झाले आहे. परंतु, पाणीसाठ्यामुळे धरण जलाशयातील हेडवर्क्सची कामे बंद पडलेली होती. गेल्या २८ फेबु्रवारीला मुकणे धरणातून आवर्तन सोडण्यात आल्याने पाणीसाठा ३८ टक्क्यांवर आला असून, त्यामुळे हेडवर्क्सच्या कामाला सुरुवात झाली आहे. पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेणाºया एल अ‍ॅण्ड टी कंपनीला जुलै २०१८ अखेर काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली आहे परंतु, पाणीसाठ्यामुळे कामात खोळंबा झाल्याने कंपनीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता असून, डिसेंबर २०१८ अखेर मुकणेचे पाणी नाशिकला आणण्याचे नियोजन केले जात आहे.

Web Title: Headworks launches: Mukesh's death anniversary is likely to increase the company's exposure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण