संदर्भ सेवामध्ये ‘आरोग्यवर्धिनी’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 12:56 AM2019-03-09T00:56:38+5:302019-03-09T00:56:55+5:30

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात महिला दिनाच्या निमित्ताने अनेक वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या महिला अधिकारी कर्मचाऱ्यांना आरोग्यवर्धिनी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

'Health Advantage Award' in reference service | संदर्भ सेवामध्ये ‘आरोग्यवर्धिनी’ पुरस्कार

संदर्भ सेवामध्ये ‘आरोग्यवर्धिनी’ पुरस्कार

Next

नाशिक : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात महिला दिनाच्या निमित्ताने अनेक वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या महिला अधिकारी कर्मचाऱ्यांना आरोग्यवर्धिनी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
अध्यक्षस्थानी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही. बी. नामपल्ली होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलिमा पवार, आहारतज्ज्ञ रंजिता शर्मा, मुख्य औषध निर्माण अधिकारी हेमलता चौधरी, परिसेविका पुष्पा गोसावी, अधिपरिचारिका दीपावली सोनवणे, सफाई कामगार शीतल महाले व वर्षा वाघ यांचा सत्कार डॉ. नामपल्ली यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ. थेटे, माजी मेट्रन अंजना पानसरे उपस्थित होत्या. गीता नागपुरे यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार श्रीमती एन. डी. नाईक यांनी केले. यावेळी ज्योती वाघ, विजया दाभाडे, हेमलता चौधरी, अनिता पवार, सविता वाकचौरे आदी उपस्थित होते.

Web Title: 'Health Advantage Award' in reference service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.