धर्मादाय रुग्णालयांमध्ये आरोग्यदूत नेमणार : मिसाळ
By सुयोग जोशी | Updated: April 4, 2025 17:49 IST2025-04-04T17:49:38+5:302025-04-04T17:49:55+5:30
नाशिक (सुयोग जोशी) : पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयातील घटनेची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या चौकशीत जे कोणी ...

धर्मादाय रुग्णालयांमध्ये आरोग्यदूत नेमणार : मिसाळ
नाशिक (सुयोग जोशी) : पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयातील घटनेची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या चौकशीत जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. राज्यातील कुठल्याही रुग्णालयात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगत बरेच धर्मादाय रुग्णालय सेवा देत नाही, हे खरं आहे. धर्मादाय रुग्णलयांमध्ये एक आरोग्यदूत नेमणार असल्याचेही वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
त्या नाशिक येथे पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, वक्फ विधेयक पास झाले, याबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानते. ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना आता न्यायालयात जाता येईल. बऱ्याच तरतुदी बदलण्यात आल्या. त्या विधेयकावर अभ्यास करण्यात आला, चर्चा झाली तर अनेक जणांची मते घेतली गेली. वक्फ कायद्याला काही संघटना विरोध करत असून, लोकशाही आहे, त्यामुळे विरोध होणारच असेही मिसाळ म्हणाल्या.
जिल्हा रुग्णालयातील घटनेबद्दल माहिती नसून त्याबाबत तपास करून माहिती घेण्याचे आश्वासन दिले. तर विद्यापीठ निवडणूक स्थगित झाली असली तरी त्यात काही चुकीचे घडलं असेल मला वाटत नाही, उलट निवडणुका घेणे गरजेचे असते. रिक्षाचालक अरेरावीबाबत काही तक्रारी आल्या तर कारवाई करणार, असे सांगत रिक्षा संघटनांची देखील आम्हाला मदत होत आहे. चुकीच्या रिक्षाचालकांवर ते देखील कारवाई करणार असल्याचे मिसाळ म्हणाल्या.
जिल्हा रूग्णालयातील घटनेची चौकशी करणार
जिल्हा रूग्णालयातील घडलेली घटना दुर्देवी आहे. शासकीय महाविद्यालये आणि जिल्हा रूग्णालये सलग्नच असतात. त्यामुळे कोणी जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याची गरज नाही. याबाबत अधिक माहिती घेऊन जिल्हा रूग्णालयातील घटनेची चौकशी करणार असल्याचे मिसाळ यांनी सांगितले.