हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस सेंटर; होमिओपॅथीला डावलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:46 AM2018-12-26T00:46:32+5:302018-12-26T00:46:51+5:30

भारतीय चिकित्सा पद्धतीत आयुर्वेदासोबतच सिद्ध, युनानी, योग आणि होमिओपॅथीचाही समावेश होतो. परंतु, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस सेंटरच्या कम्युनिटी हेल्थ आॅफिसर (सीएचओ) तथा उपआरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिकारी नियुक्ती प्रक्रियेत बीएएमएस पदवीची अट असल्याने होमिओपॅथी (बीएचएमएस) डॉक्टरांना डावलले गेले आहे.

 Health and Wellness Center; Homeopathy Dowley | हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस सेंटर; होमिओपॅथीला डावलले

हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस सेंटर; होमिओपॅथीला डावलले

Next

नाशिक : भारतीय चिकित्सा पद्धतीत आयुर्वेदासोबतच सिद्ध, युनानी, योग आणि होमिओपॅथीचाही समावेश होतो. परंतु, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस सेंटरच्या कम्युनिटी हेल्थ आॅफिसर (सीएचओ) तथा उपआरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिकारी नियुक्ती प्रक्रियेत बीएएमएस पदवीची अट असल्याने होमिओपॅथी (बीएचएमएस) डॉक्टरांना डावलले गेले आहे. त्यामुळे आरोग्य विभाग होमिओपॅथीला सापत्न वागणूक देत असल्याची भावना निर्माण झाली असून, हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस सेंटरमध्ये बीएएमएस सोबतच बीएचएमएस डॉक्टरांचाही सीएचओ म्हणून समावेश करावा तसेच प्रत्येक उपआरोग्य केंद्रावर बीएचएमएस डॉक्टरांची नियुक्ती करण्याची मागणी होमिओपॅथी डॉक्टरांकडून होत आहे.  केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून संपूर्ण भारतात हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस सेंटरच्या माध्यमातून कम्युनिटी हेल्थ आॅफिसरची नियुक्ती करण्यात येणार आहे.
हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस सेंटर; होमिओपॅथीला डावलले  त्यासाठी राज्य सरकारने भरती प्रक्रियाही सुरू केली आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण देशभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या उपकेंद्रांवरही दीड लाख पदांची भरती करण्यात येणार आहे. परंतु या पदांच्या भरतीसाठी पात्रतेच्या निकषांमध्ये बीएएमएस पदवी आवश्यक करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सुमारे ७० हजार बीएचएमएस डॉक्टरांसह देशभरातील सुमारे अडीच लाख होमिओपॅथी डॉक्टरांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे या पात्रतेच्या निकषांमध्ये आवश्यक ते बदल करून सीएचओ पदासह उपकेंद्रस्तर पदांवरील भरतीसाठी बीएचएमएस डॉक्टरांनाही संधी मिळावी, अशी मागणी होमिओपॅथी डॉक्टरांच्या संघटनांनी केली आहे.
होमिओपॅथी डॉक्टरांना अन्य पॅथींच्या तुलनेत समसमान वागणूक मिळण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. सीएचओ आणि उपकेंद्र स्तरावरील पदांच्या भरतीसाठी बीएचएमएस डॉक्टरांना संधी मिळावी, यासाठी प्रक्रियेत आवश्यक त्या सुधारणा करण्याची गरज आहे.
- डॉ. अमित भस्मे, सिनेट सदस्य, महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक

Web Title:  Health and Wellness Center; Homeopathy Dowley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.