मनमाड महाविद्यालयातर्फे आरोग्य जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 11:51 PM2020-04-25T23:51:36+5:302020-04-25T23:52:01+5:30

मनमाड येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्यातर्फे कोरोना विषाणूसंदर्भात विविध उपक्रमांद्वारे आरोग्य जनजागृती करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन मास्कचे वाटप केले.

Health Awareness by Manmad College | मनमाड महाविद्यालयातर्फे आरोग्य जनजागृती

मनमाड येथे घरोघरी मास्कचे वाटप करताना नीलेश सोनवणे, पल्लवी सोनवणे, अश्विनी परदेशी आदी.

Next
ठळक मुद्देराष्टÑीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांकडून स्वनिर्मित मास्कचे घरोघरी वाटप

मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्यातर्फे कोरोना विषाणूसंदर्भात विविध उपक्रमांद्वारे आरोग्य जनजागृती करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन मास्कचे वाटप केले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे आपण टाळेबंदी पुकारलेली आहे. या जागतिक महामारीला तोंड देण्यासाठी शासनाने नागरिकांसाठी काही आचारसंहिता घालून दिलेली आहे. या नियमांचे पालन करून इतरांना मदत करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
शासनाच्या आवाहनानुसार प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्र म अधिकारी डॉ. पी. बी. परदेशी, प्रा. एन. ए. पाटील व प्रा. वर्षाराणी पेडेकर, विद्यार्थी विकास मंडळाचे डॉ. डी. एल. शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली २५०० मास्कची निर्मिती, विविध व्हिडीओ, बॅनर तयार करून जनजागृती करणे, सर्व्हे, आरोग्य सेतू अ‍ॅपविषयी माहिती देण्यात येत आहे. ऋषी सरोदे, सूरज गुंडगळ, वैभव गुंडगळ, नीलेश सोनवणे, पल्लवी सोनवणे, अश्विनी परदेशी यांनी घरोघरी मास्क वाटप केले.

Web Title: Health Awareness by Manmad College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.