‘वनांमध्ये राबताना आरोग्याविषयक सजगता हवी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:18 AM2021-03-09T04:18:00+5:302021-03-09T04:18:00+5:30
नाशिक पश्चिम वनविभागाच्या वतीने उंटवाडी येथील वन विश्रामगृहात जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर वन संवर्धन अन् महिलांचे आरोग्य या विषयावर ...
नाशिक पश्चिम वनविभागाच्या वतीने उंटवाडी येथील वन विश्रामगृहात जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर वन संवर्धन अन् महिलांचे आरोग्य या विषयावर चर्चासत्र व कार्यशाळा सोमवारी (दि.८) घेण्यात आली. या कार्यशाळेत डॉ. प्राजक्ता सैंदाणे, आयकर विभागाच्या सहायक आयुक्त भुमिका गर्ग, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वर्षा मीना, विभागीय वनाधिकारी कांचन पवार, योग अभ्यासक सायली चव्हाण आदि मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी सैंदाणे तसेच चव्हाण यांनी महिलांनी आरोग्यविषयक घ्यावयाची खबरदारी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच पवार आणि वनक्षेत्रपाल सीमा मुसळे यांनी शासकिय नोकरी करताना आरोग्याकडे कळतनकळत स्वत:च्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष याकडे लक्ष वेधले. प्रारंभी उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहायक वनसंरक्षक गणेश झोळे यांच्या उपस्थित दीपप्रज्वलन तसेच उंबर प्रजातीच्या रोपट्याला पाणी देत चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, वनरक्षक शाभा वाकचौरे, रत्ना तुपलोंढे, वत्सला कांगने यांनी वनवणवा याविषयी प्रबोधनपर पथनाट्य, एकांकिका सादर केली.
प्रास्ताविक व सुत्रसंचालन परिविक्षाधीन वनक्षेत्रपाल पुष्पा सातारकर यांनी केले. आभार मुसळे यांनी मानले.