महिलांसाठी आरोग्य जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:24 AM2019-09-28T00:24:42+5:302019-09-28T00:25:22+5:30
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वुमन डॉक्टर्स विंगतर्फे सर्व महिलांसाठी हेल्दी डॉक्टर, हेल्दी सोसायटी या घोषवाक्याला अनुसरून ‘फिट फेस्ट फॉर हर’ हा उपक्र म सप्तपदी हॉल येथे संपन्न झाला.
नाशिक : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वुमन डॉक्टर्स विंगतर्फे सर्व महिलांसाठी हेल्दी डॉक्टर, हेल्दी सोसायटी या घोषवाक्याला अनुसरून ‘फिट फेस्ट फॉर हर’ हा उपक्र म सप्तपदी हॉल येथे संपन्न झाला.
या कार्यक्र मात दीपाली चांडक यांच्या फायनान्स मॅनेजमेंटने कैरी लोणचेपासून ते ट्रेडिंग आणि वुमेन्स इंटरप्रेनरपर्यंतचा प्रवास सुकर केला. बॉलिवुड फिटनेस गुरू लीना मोगरे यांनी योगा, प्राणायाम आणि व्यायाम यांची योग्य सांगड घालत तरु णपणा कायम टिकविण्याचे रहस्य सांगितले.
कार्यक्र माठी वुमन्स विंगच्या प्रमुख डॉ. गीतांजली गोंदकर, सचिव डॉ. सुलभा पवार, डॉ. प्रितिका चौधरी आणि सर्व वुमन्स विंग कमिटीने सहकार्य केले. कार्यक्र माला आयएमए नाशिकचे अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे, सचिव डॉ. विशाल गुंजाळ, उपाध्यक्ष डॉ. हेमंत सोनानीस, खजिनदार डॉ. किरण शिंदे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. राजश्री पाटील, डॉ. शलाका बागुल व डॉ. शीतल मोगल यांनी केले.
प्रात्यक्षिक सादर
आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी यांनी आहार विज्ञान अतिशय सोप्या भाषेत विशद केले. मानसरोगतज्ज्ञ डॉ. तृप्ती पटेल यांनी मनोगत व्यक्त केले. भूलतज्ज्ञ टिमने अचानक अस्वस्थ होऊन कोसळणाऱ्या, बेशुद्ध पडणाºया व्यक्तींसाठी प्रात्यक्षिक सादर केले.