शिंपी टाकळीत पूरग्रस्तांसाठी आरोग्य शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 04:09 PM2019-08-29T16:09:48+5:302019-08-29T16:10:05+5:30

७५ लोकांची वैद्यकीय तपासणी

Health camp for flood victims | शिंपी टाकळीत पूरग्रस्तांसाठी आरोग्य शिबिर

शिंपी टाकळीत पूरग्रस्तांसाठी आरोग्य शिबिर

Next
ठळक मुद्देनिफाडचे समुपदेशक प्रशांत शिरसाठ यांनी एन सी डी कार्यक्र माबाबत माहिती दिली.

नायगाव : निफाड उपजिल्हा रु ग्णालय व शिंपीटाकळी ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्तांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
निफाड उपजिल्हा रु ग्णालयाचे समुपदेशक नितीन परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आरोग्य शिबिरात पूर परिस्थितीनंतर गावाने व कुटूंबाने आरोग्यासाठी स्वच्छता कशी ठेवावी, गावात पुर वाहिल्यानंतर परिसरात निर्माण होणाऱ्या आजारांबाबत कोणती काळजी घ्यावी याबाबतीत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच युवा पंधरवडा निमित्त एच.आय. व्ही एड्स या आजाराबाबत माहिती देण्यात आली. एच.आय.व्ही होण्याचे कारण, प्रतिबंधक उपाय, समज गैरसमज, औषधापचार व सर्व सरकारी दवाखान्यात मोफत एच आय व्ही तपासणी केली जाते याविषयी दोडी ग्रामीण आरोग्य विभागाचे समुपदेशक विलास बोडके यांनी उपस्थित विद्यार्थी व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. या आजारा बाबतची सर्व माहिती गोपनीय ठेवली जात असल्यामुळे प्रत्येक युवक -युवतीने लग्नाआधीच तपासणी करणे काळाची गरज असल्याचे बोडके यांनी सांगितले . यावेळी निफाडचे समुपदेशक प्रशांत शिरसाठ यांनी एन सी डी कार्यक्र माबाबत माहिती दिली. या आरोग्य शिबिरात ७५ लोकांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या . तसेच ४८ लोकांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली . यावेळी शिंपी टाकळी येथील सरपंच सुषमा प्रकाश बोडके, उपसरपंच ,सदस्य, संपत बोडके, रमेश काळे, चंद्रभान बोडके, सचिन लोखंडे आदी उपस्थित होते.
 

Web Title: Health camp for flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.