आरोग्यसेविकेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:54 AM2018-11-30T00:54:03+5:302018-11-30T00:54:49+5:30
सिन्नर : तालुक्यातील देवपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेविका कल्पना पंढरीनाथ शेळके (२९) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली.
सिन्नर : तालुक्यातील देवपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेविका कल्पना पंढरीनाथ शेळके (२९) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली.
कल्पना पंढरीनाथ शेळके (२९) देवपूर गावात राहात होत्या. गुरुवारी सकाळी लसीकरण शिबिर होते. सहकारी शेळके यांना घ्यायला वाहन घेऊन घरी गेले. फोन उचलला जात नसल्याने सहकारी सेविका दरवाजा वाजवू लागल्या तरी प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे खिडकीतून डोकावले असता छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत शेळके दिसून आल्या. या प्रकाराची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. मयत कल्पना शेळके विशाल शेळके यांनी केंद्रातील डॉ. दाणी व वाघ हे बहिणीला त्रास देत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तिला रात्रपाळी ड्यूटी देत होते. बहिणीने पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती. बहीण तणावात होती. या त्रासातून तिने आत्महत्त्या केल्याची तक्रार शेळके यांनी पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी डॉ. दाणी व वाघ (पूर्ण नाव नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.