आरोग्य केंद्राचे काम पाडले बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 10:50 PM2020-03-11T22:50:19+5:302020-03-11T22:54:13+5:30

पाटोदा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत प्रहार संघटनेने काम बंद पाडले. पाटोदा येथे राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व त्यासाठी तीन कोटी पाच लाख रुपये निधी मंजूर असलेला सुसज्ज अशा रुग्णालयाच्या इमारतीचे पायाभरणीचे काम सुरू आहे. प्रहार शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष रामभाऊ नाईकवाडी यांनी इमारतीच्या पायाभरणीच्या कामाची पाहणी केली. त्यात सिमेंट व वाळू वापरत नसल्याचे लक्षात आल्याने सुरू असलेले निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप करत बंद पाडले.

Health center closed down! | आरोग्य केंद्राचे काम पाडले बंद !

आरोग्य केंद्राचे काम पाडले बंद !

Next
ठळक मुद्देसदर ठेकेदार ठरावीक मापदंडानुसार काम करत नसून काम बंद करण्याच्या सूचना दिल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
पाटोदा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत प्रहार संघटनेने काम बंद पाडले.
पाटोदा येथे राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व त्यासाठी तीन कोटी पाच लाख रुपये निधी मंजूर असलेला सुसज्ज अशा रुग्णालयाच्या इमारतीचे पायाभरणीचे काम सुरू आहे. प्रहार शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष रामभाऊ नाईकवाडी यांनी इमारतीच्या पायाभरणीच्या कामाची पाहणी केली. त्यात सिमेंट व वाळू वापरत नसल्याचे लक्षात आल्याने सुरू असलेले निकृष्ट दर्जाचे काम
होत असल्याचा आरोप करत बंद पाडले.
येवला तालुक्यातील राजकीय तसेच आर्थिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या पाटोदा येथील आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे बांधकाम शासकीय निधीतून सुरू आहे. पायाभरणीचे काम निकृष्ट दर्जाचे बांधकाम मटेरिअल वापरत असल्याचे गावातील प्रहारचे जिल्हा कार्याध्यक्ष रामभाऊ नाईकवाडे व शाखाध्यक्ष गोरख निर्मळ
यांच्या लक्षात आले. त्यांनी इतर कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या मदतीने बांधकामस्थळी जात पाहणी करून सुपरवायझर व ठेकेदार यांना सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असून, कामाच्या प्लॅन इस्टिमेटबाबत विचारणा केली.
वास्तविक शासन विकास-कामांसाठी जनसामान्यांच्या करातून आलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम खर्च करते; पण संगनमताने सर्वस्तरीय चळवळीतून मोजकी रक्कम शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत असताना असे गैरप्रकार प्रहार संघटना खपवून घेणार नाही, असे रामभाऊ नाईकवाडे, गोरख निर्मळ व हरिभाऊ महाजन यांनी सांगितले.
यावेळी सुनील पाचपुते,
सरपंच चंद्रकला नाईकवाडे, दिनेश जगताप, रतन बोरणारे, बाळासाहेब बोराडे, सोमनाथ भुसारे, किशोर भोसले, दत्तू बोरणारे व ग्रामस्थ उपस्थित होते. सुपरवायझर निरुत्तर, तर ठेकेदाराची सारवासारव
४सदर ठेकेदाराने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने रामभाऊ नाईकवाडे यांनी गटविकास अधिकारी व पंचायत समिती सभापती यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत निकृष्ट कामाबाबत माहिती दिली. सदर ठेकेदार ठरावीक मापदंडानुसार काम करत नसून काम बंद करण्याच्या सूचना दिल्या
व कामाची लवकरच
पाहणी केली जाईल, असे सांगितले. याबाबत सुपरवायझर निरुत्तर झाला तर ठेकेदाराने सारवासारव केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.अंदाजपत्रकानुसार सदर काम होत नसल्याचे निदर्शनास आले. याबाबत सदर ठेकेदारास माहिती देण्यात आली. मात्र त्याने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.
- रामभाऊ नाईकवाडे

Web Title: Health center closed down!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.