ठाणगाव ग्रामपंचायतीतर्फे आरोग्य केंद्रास औषधे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 11:00 PM2020-04-09T23:00:43+5:302020-04-09T23:10:21+5:30
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील ग्रामपंचायतच्या वतीने आरोग्य केंद्रासाठी औषधांचे पॅकेज देण्यात आले. सरपंच सीमा शिंंदे यांच्या संकल्पनेतून ही औषधे देण्यात आली. ठिकाणी ग्रामपंचायतीकडून मदतीसाठी ओघ सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने ८४ हजार रुपये किंमतीचे औषध आरोग्य केंद्रास देण्यात आले.
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील ग्रामपंचायतच्या वतीने आरोग्य केंद्रासाठी औषधांचे पॅकेज देण्यात आले.
सरपंच सीमा शिंंदे यांच्या संकल्पनेतून ही औषधे देण्यात आली. ठिकाणी ग्रामपंचायतीकडून मदतीसाठी ओघ सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीच्या वतीने ८४ हजार रुपये किंमतीचे औषध आरोग्य केंद्रास देण्यात आले. त्यात, हॅण्डग्लोज, मेडिसिन, आरोग्य केंद्र फवारण्यासाठी पंप, सॅनिटायझर, डेटॉल साबण, मास्क आदी औषध साठा ठाणगाव येथील वैद्यकीय अधिकारी आर. डी. धादवड यांच्याकडे देण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते ए. टी. शिंदे, शेखर कर्डिले, रामदास भोर, वैशाली केदार, डॉ. वैभव गरुड, एस. जी. काळे, एस. डी. कहांडळ, एन. आर. घोटेकर, डी. एस. ठाकरे, स्वाती केदार, रंजना गाडेकर, आशा कार्यकर्र्त्या उपस्थित होत्या.