संगमेश्वरात १०४ जणांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 10:30 PM2020-08-17T22:30:02+5:302020-08-18T01:10:55+5:30

मालेगाव : शहरातील संगमेश्वरमधील वाल्मिकनगर शाळेत महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. एकूण ५२ जणांची तपासणी आरोग्य पथकाने केली. त्यात ९ जण संशयीत आढळले आले.

Health check-up of 104 people in Sangameshwar | संगमेश्वरात १०४ जणांची आरोग्य तपासणी

संगमेश्वरात १०४ जणांची आरोग्य तपासणी

Next
ठळक मुद्देसंबंधित सेंटर मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे याचा परिसरातील नागरिकांना त्रास होतो.

मालेगाव : शहरातील संगमेश्वरमधील वाल्मिकनगर शाळेत महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. एकूण ५२ जणांची तपासणी आरोग्य पथकाने केली. त्यात ९ जण संशयीत आढळले आले. शहरातील कलेक्टरपट्टा भागात ५२ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात दोन जण संशयीत आढळून आले. त्यांना स्वॅब देण्यास सांगण्यात आले. नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे, मुखपट्टीचा वापर करावा असे आवाहन महापौर ताहेरा शेख यांनी केले आहे. अशी माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी दिली.मसगा कोविड सेंटर इतरत्र हलविण्याची मागणीमालेगाव : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले मसगा महाविद्यालयातील कोविड सेंटरमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सेंटर दुसऱ्या ठिकाणी सुरू करावे, अशी मागणी रहिवाशांनी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून मसगा महाविद्यालयात कोविड सेंटर सुरू आहे. रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. संबंधित सेंटर मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे याचा परिसरातील नागरिकांना त्रास होतो.
४जिल्ह्यात सर्वच ठिकाणी कोविड सेंटर गावाबाहेर आहेत. मात्र मालेगावी मध्यवर्ती ठिकाणी सेंटर उभारण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांना कोरोनाची लागन होऊ शकते. यामुळे हे सेंटर गावाबाहेर सुरू करावे अशी मागणी सचिन अहिरे, बाजीराव अहिरे, निखिल निकम, मिनल नेरकर, संदीप शिरुडे, अनिकेत सूर्यवंशी, स्वाती खैरनार, विशाल ठाकरे, राकेश देवरे, सुयश बच्छाव, वैशाली पवार आदींसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Health check-up of 104 people in Sangameshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.