अलई विद्यालयात आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 09:23 PM2021-01-04T21:23:00+5:302021-01-05T00:11:32+5:30
नामपूर : येथील उन्नती संस्थेच्या अलई माध्यमिक विद्यालयात कोरोना संसर्गामुळे दहा महिन्यांनंतर नववी व दहावीचे वर्ग सोमवारी (दि. ४) सुरू झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
Next
विद्यार्थी शाळेत आल्यावर सर्वप्रथम त्यांची ऑक्सिमीटर व तापमापिकेच्या साहाय्याने तपासणी करण्यात आली. मुख्याध्यापक स्नेहलता नेरकर यांनी विद्यार्थ्यांना कोरोनापासून कशी व कोणती काळजी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन केले. प्रारंभी शाळेच्या वर्गांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. त्यानंतर, वर्गात प्रत्येक विद्यार्थ्यास शारीरिक अंतर ठेऊन वर्गात बसविण्यात आले. परिपाठाच्या तासात मानसी बच्छाव या विद्यार्थिनीने कोरोनावर आधारित एकपात्री नाटिका सादर केली. शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याचे मुख्याध्यापक नेरकर यांनी मिठाई भरवून स्वागत करण्यात आले.