उजनी येथे आरोग्य तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 12:11 AM2018-03-03T00:11:36+5:302018-03-03T00:11:36+5:30
सिन्नर तालुक्यातील उजनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला, तर अनेक युवकांसह महिलांनी रक्तदान केले.
मुसळगाव : सिन्नर तालुक्यातील उजनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला, तर अनेक युवकांसह महिलांनी रक्तदान केले. सरपंच भारती वाघ, उपसरपंच संगीता सापनर, पोलीसपाटील दत्तात्रय सापनर यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. उजनी व परिसरातील नागरिकांनी सहभाग घेत आरोग्य तपासणी करून घेतली. सुमारे १५० रुग्णांची तपासणी करण्यात आली. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत धामणगाव येथील एसएमबीटी इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स अॅण्ड रिसर्च सेंटरचे डॉ. बाळकृष्ण पाटील, डॉ. आशा वाधवानी यांनी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले. या योजनेंतर्गत ९७१ उपचार व १२१ पाठपुरावा सेवा समाविष्ट केल्या आहेत. यावेळी भास्कर सापनर, सुनील सापनर, श्रीकांत वाघ, भाऊसाहेब वाघ, बाळासाहेब साबळे, हरिभाऊ सापनर, श्रावण वाघ, नवनाथ वाघ, बापू पोलगर, रखमा वाघ, वेणूबाई वाघ, प्रवीण जगताप, उज्ज्वला पोलगर, बाळासाहेब सापनर, गोविंद मोरे, अनिल जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. महिला व तरुणांनी उत्साहात रक्तदान केले. विविध व्याधींवर व्याधीनिदान योजनेच्या रुग्णालयांमध्ये मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे.