देवगाव परिसरात आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 05:59 PM2020-07-08T17:59:36+5:302020-07-08T17:59:52+5:30
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोरोनाची संपर्क साखळी खंडित करण्यासाठी देवगाव ग्रुप ग्रामपंचायतकडून नागरिकांची घरोघर जाऊन तपासणी करण्यात येत आहे.
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोरोनाची संपर्क साखळी खंडित करण्यासाठी देवगाव ग्रुप ग्रामपंचायतकडून नागरिकांची घरोघर जाऊन तपासणी करण्यात येत आहे. तसेच पावसाळ्यात साथीचे रोग वाढू नये यासाठी मेडिक्लोर जलड्रॉप देखील वाटण्यात आले.
मागील आठवड्यात देवगाव गावालगत असलेल्या वावीहर्षे येथे कोरोना संशयित रु ग्ण सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. देवगावमध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव होऊ नये म्हणून ग्रामप्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांच्याकडून आरोग्य तपासणी सुरू केली आहे. नागरिकांना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन सरपंच राजु कौले, माजी सरपंच मंगेश वारे, ग्रामसेवक के.एच. राठोड, ग्रामपंचायत कर्मचारी पोपट रोकडे, आशा सेविका योगिता वारे आदी करत आहेत.