मालेगाव मनपाकडून आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 10:37 PM2020-08-17T22:37:15+5:302020-08-18T01:12:04+5:30

मालेगाव : शहरातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून गेल्या दोन दिवसांपासून विविध भागात नागरिकांची स्क्रिनिंग व आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

Health check up from Malegaon Municipal Corporation | मालेगाव मनपाकडून आरोग्य तपासणी

मालेगाव मनपाकडून आरोग्य तपासणी

Next
ठळक मुद्देसोयगाव नागरी आरोग्य केंद्रात ७५ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : शहरातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून गेल्या दोन दिवसांपासून विविध भागात नागरिकांची स्क्रिनिंग व आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
सोमवारी सोयगाव नागरी आरोग्य केंद्रात ७५ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात तीन संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तपासणी शिबिर राबविली जात असून, गरजेनुसार २५पेक्षा अधिक प्रकारच्या रक्ताच्या चाचण्या व इतर चाचण्या घेतल्या जात आहेत. शरीरातील आॅक्सिजनचे प्रमाण, रक्तदाब, शरीराचे तपमान आदींची तपासणी केली जात आहे. १८ आॅगस्ट रोजी कॅम्पातील हनुमान मंदिरात व १९ आॅगस्ट रोजी पुष्पाताई हिरे नगर भागातील मराठी शाळेत तपासणी शिबिर घेतले जाणार आहेत.
या तपासणी शिबिराप्रसंगी आरोग्य अधिकारी सपना ठाकरे, वैद्यकीय अधिकारी जयश्री पवार, उज्वला देवरे, प्रज्ञा देवरे, बेबी सोनवणे, पुष्पा बैरागी, शितल पवार आदि कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Health check up from Malegaon Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.