पाटणेत ग्रामस्थांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 09:02 PM2020-05-10T21:02:00+5:302020-05-10T21:02:20+5:30
पाटणे : मालेगाव येथे कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या पाटणेकरांसाठी चिंतेची बाब ठरत असून, भारतीय जैन संघटना व एकता मंडळ यांच्या सहयोगाने गावात आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क

प्रत्येक गल्लीत प्रत्येकाच्या घरी जाऊन घरातील सर्व व्यक्तींच्या वैयक्तिक शारीरिक तपासण्या करण्यास प्रांरभ करण्यात आला. डॉ. किरण बागुल, डॉ. पाटील, डॉ. अनिल रोकडे , डॉ. दिनेश आहिरे, रोहित (सागर) खैरनार, चेतन शेवाळे, आरोग्य सेवक डॉ. अरुण पाटील, आरोग्य सेविका डॉ. सुरेखा देवरे सर्व आशा सेविका यांनी तपासण्या केल्या.
उद्घाटन जैन संघटनेचे अध्यक्ष अनिल कांकरिया यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच राहुलाबाई आहिरे, उपसरपंच मोनाली पवार, माजी सरपंच तुकाराम बागुल, नथू खैरनार, संदेश खैरनार, प्रकाश पगारे, जितेंद्र खैरनार, सुभाष अहिरे, कमलाकर खैरनार, मदन गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. नथू खैरनार यांनी आभार मानले.