येवला बाजार समितीमधील कामगारांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 04:43 PM2018-08-08T16:43:34+5:302018-08-08T16:44:07+5:30
येवला : येथील बाजार समिती व आधार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात मंगळवारी (दि.७) माथाडी व मापारी कामगारांसाठी सर्वरोग निदान व उपचार शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन बाजार समितीच्या सभापती उषा शिंदे, स्त्रीरोगतज्ज्ञ संगीता पटेल, डॉ. इम्रान सैयद यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरात ए. ए. फैजी, आय. सी. शेख, अलंकार गायके, इम्रान सैयद, स्वप्निल आहेर, निषाद शाह आदी डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांची तपासणी केली.
याप्रसंगी शहरातील इनरव्हील क्लबच्या महिला सदस्यांतर्फेमाथाडी, मापारी कामगार व महिलांना मास्क व फळांचे वाटप करण्यात येऊन त्यांचा रक्तदाब तपासण्यात आला. त्याचप्रमाणे आधार मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येवला यांच्या तर्फे माथाडी, मापारी कामगार व इतर घटकांसाठी साखर, रक्तदाब तपासणी व इतर तपासण्या करण्यात येऊन मोफत औषधे देण्यात आली. यावेळी इनरव्हील क्लब आॅफ येवलाच्या सदस्य शैला कलंत्री, पिनल वर्मा, अंकिता सोमाणी, वसुधा गुजराथी, वंदना सोनवणे, विजया पाटील, सुचिता मंडलेचा, शिल्पा पटेल, श्वेता पटेल, राजश्री पहिलवान, स्मिता पटेल तसेच बाजार समितीचे उपसभापती गणपत कांदळकर, संचालक नवनाथ काळे, कृष्णराव गुंड, संजय बनकर, अशोक मेंगाणे, मोहन शेलार, संतू पा. झांबरे, भास्कर कोंढरे, कांतिलाल साळवे, मकरंद सोनवणे, धोंडीराम कदम, नंदकिशोर आट्टल आदींसह बाजार समितीचे अधिकारी/कर्मचारी, बी. ए. आहेर, एस. टी. ठोक, एस. जे. जाधव, बी. डी. गायकवाड, अनिल कांगणे उपस्थित होते.