निर्वासितांना आरोग्याची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 10:44 PM2020-05-05T22:44:20+5:302020-05-05T22:44:32+5:30

नाशिक : निवारा केंद्रात असलेले अनेक निर्वासित आपापल्या गावी परतले असले तरी अजूनही केंद्रात आश्रयास असलेल्यांना आरोग्याचा प्रश्न भेडसावत आहे. अपुरे शौचालय आणि डिस्टन्स नियमांचे पालन करण्याबाबत पुरेशी व्यवस्थाच नसल्याने केंद्रातील निर्वासितांना आरोग्याची काळजी लागली आहे.

 Health concerns for refugees | निर्वासितांना आरोग्याची चिंता

निर्वासितांना आरोग्याची चिंता

Next

नाशिक : निवारा केंद्रात असलेले अनेक निर्वासित आपापल्या गावी परतले असले तरी अजूनही केंद्रात आश्रयास असलेल्यांना आरोग्याचा प्रश्न भेडसावत आहे. अपुरे शौचालय आणि डिस्टन्स नियमांचे पालन करण्याबाबत पुरेशी व्यवस्थाच नसल्याने केंद्रातील निर्वासितांना आरोग्याची काळजी लागली आहे.
जिल्ह्यात २७ निवारा केंद्रांमध्ये जवळपास दोन हजार मजूर, विद्यार्थी आणि कामगार आश्रयाला होते. नाशिकमधून दोन रेल्वे गाड्यांमधून अनेक कामगार रवाना झालेले आहेत. मात्र बरेचसे मजूर अजूनही आश्रयाला आहेत. शहरातील संत गाडगेबाबा धर्मशाळा, पंचम येथील मनपा शाळा, तसेच देवळाली गावातील निर्वासित केंद्राची प्रातिनिधिक स्वरूपात पाहणी केली असता या केंद्रांमध्ये अपुऱ्या सुविधा असल्याचे निदर्शनास आले, शिवाय अशा तक्रारीदेखील समोर आल्या आहेत.
अपुरी शौचालये
परिसरात आणि इमारतीमध्ये औषध फवारणी केली जात असली तरी ३० ते ४० व्यक्तींसाठी केवळ दोन ते तीन शौचालये असल्याचे दिसून आले. येथे राहणाºया अनेकांनी नाइलाज असल्याचे सांगून अधिक बोलणे टाळले. करमणुकीसाठी टीव्ही आणि प्रोजेक्टरद्वारे चित्रपट दाखविले जात असले तरी डिस्टन्स नियम राखला जातोच असे नाही. कळत नकळत आपसातील अंतर कमी होत असल्याचे येथील रहिवाशीच सांगतात.
जेवणाची वाट बघण्याची वेळ
गाडगेबाबा धर्मशाळा येथे नगरसेवकांच्या मदतीतून आणि एका सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र जेवण घेऊन येणारे वाहन वेळेवर येतेच असे नाही. त्यामुळे वाट पहावी लागत असल्याची तक्रार अनेकांनी केली. चहा काही दिवस आला तोही बंद झाला. एकाच ताटात भात, भाजी आणि भाकरी दिली जाते. त्यामुळे भाकरी हातात घेऊन जेवण उरकावे लागते.
डिस्टन्स राखणार कसे
पंचक आणि देवळाली गावातील केंद्र मनपा शाळांमध्ये आहे. मात्र जाण्या-येण्याचा मार्ग तसेच वºहांड्यात बसल्यामुळे डिस्टन्स नियमांचा भंग होतो. अनेक ठिकाणच्या निवारा केंद्रांतील अवस्था यापेक्षा वेगळी नाही. मोबाइल पाहण्यासाठीदेखील एकत्र आलेल्यांमुळे नियमांचा भंग होतो. स्नानगृहाचा प्रश्नदेखील यापेक्षा वेगळा नाही.

Web Title:  Health concerns for refugees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक