हरसूलच्या आंदोलनात आरोग्य विभाग धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 23:54 IST2020-01-08T23:54:26+5:302020-01-08T23:54:48+5:30
हरसूल येथे त्र्यंबकेश्वर तालुका कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हा सेक्रेटरी इरफान शेख यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आशा कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवित समस्यांचा पाढा वाचला. यावेळी त्र्यंबकेश्वरचे नायब तहसीलदार आर. एम. राठोड यांना विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.

हरसूल आंदोलनात विविध मागण्यांसाठी मार्गदर्शन करताना माकपाचे जिल्हा सेक्रे टरी इरफान शेख.
वेळुंजे : हरसूल येथे त्र्यंबकेश्वर तालुका कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हा सेक्रेटरी इरफान शेख यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आशा कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवित समस्यांचा पाढा वाचला. यावेळी त्र्यंबकेश्वरचे नायब तहसीलदार आर. एम. राठोड यांना विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.
देशभरातील कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या भारत बंदला त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या तालुका कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पाठिंबा देत ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आशा गतप्रवर्तक यांनीही सहभाग नोंदविला. हरसूल येथील वनविभाग प्रादेशिक कार्यालय क्षेत्राच्या आवारात सकाळी ११ वाजेच्या सुमारास ठिय्या आंदोलन करण्यात आले. दोन तास चाललेल्या या आंदोलनात उपस्थितांनी विविध विभागातील प्रश्न उपस्थित केले. यात हरसूल भागातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याकडून रुग्णांची होणारी हेळसांड, तर स्तनदा माता, गरोदर माता यांना १०८ क्रमांकाची गाडी वेळेवर उपलब्ध न होणे, आशा कर्मचारी उपलब्ध न होणे, वेळकाढूपणा करणे, रस्त्यातच प्रसूती करणे, यासाठी होणारा मनस्ताप, डॉक्टरांची अरेरावी या साऱ्या गोष्टींची दखल घेत शेख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच विविध विभागातील विषयांवर चर्चा करीत सबंधितांना सूचना करण्यात आल्या.