बदलत्या वातावरणामुळे आरोग्यावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:55 PM2019-04-18T23:55:20+5:302019-04-19T00:16:48+5:30
गेल्या काही दिवसांपासून दुपारच्या सुमारास आभाळ दाटून येण्याबरोचर पावसाच्या सरी कोसळत असल्याने तसेच सायंकाळी सुटणारा गारवारा यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे.
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून दुपारच्या सुमारास आभाळ दाटून येण्याबरोचर पावसाच्या सरी कोसळत असल्याने तसेच सायंकाळी सुटणारा गारवारा यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. सर्दी, पडसे, डोकेदुखीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे, तर लहान मुलांमध्ये ताप तसेच सर्दीचे प्रमाण वाढल्याने रुग्णालयांमध्ये गर्दी वाढल्याचे दिसते.
सकाळच्या सुमारास कडाक्याचे ऊन जाणवत असताना दुपारी २ वाजेनंतर आभाळ दाटून येण्याचे तर काही भागांत पावसाचे थेंब पडण्याचे प्रकार घडत आहेत. तासभरानंतर पुन्हा उकाडा निर्माण होऊन सायंकाळपासून गार वारे वाहू लागतात. या विचित्र वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागला आहे.