कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी्र आरोग्य विभागाची फौज तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 11:16 PM2021-03-30T23:16:41+5:302021-03-31T01:09:38+5:30

नगरसुल : येवला तालुक्यातील नगरसुल येथील रुग्णाची संख्या १७१ झाली असुन आजमितीला ॲक्टीव रुग्णाची संख्या ८५ असल्याची माहिती येवला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उमेश देशमुख यांनी दिली. गावातील वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक तैनात करण्यात आल्याचे ही त्यांनी सांगितले.

Health forces deployed to prevent corona outbreaks | कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी्र आरोग्य विभागाची फौज तैनात

नगरसुल रेल्वे स्टेशन परिसरात सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक, आशावर्कर, आरोग्य विस्तार अधिकारी डॉ. खैरे.

Next
ठळक मुद्देनगरसुल : कोविड सेंटर मधील महीलेचा मृत्यू

नगरसुल : येवला तालुक्यातील नगरसुल येथील रुग्णाची संख्या १७१ झाली असुन आजमितीला ॲक्टीव रुग्णाची संख्या ८५ असल्याची माहिती येवला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उमेश देशमुख यांनी दिली. गावातील वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाचे पथक तैनात करण्यात आल्याचे ही त्यांनी सांगितले.

आरोग्य विभाग, स्थानिक प्रशासन ग्रामपंचायत सरपंच मंदाकिनी पाटील, निकेतन पाटील, ग्रामविकास अधिकारी गोरख निकम यांच्या मदतीने गावातील व्यापारी वर्ग, भाजीपाला व फळे विक्रेते यांच्यात विचार विनिमय करून यावर उपाय म्हणून आत्ताच स्वयम स्फूतीने पाच दिवसांचा जनता कफ्यू पाळण्यात आला, त्यालाही जनतेने व व्यापारी वर्गाने चांगला प्रतिसाद दिला.
त्यानंतर देखिल गावातील कोरोना रुग्णाची संख्या कमी होताना दिसत नसल्याने पुन्हा वरीष्ट अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो असेमंगळवारी (दि.३०) झालेल्या बैठकीत नमुत नमूद करण्यात आले.

दरम्यान नगरसुल येथील कोरोना रुग्ण बाहेर उपचार दरम्यान दोन रुग्णाचा मृत्यू झाला असून एक महीला, एक पुरुष यांचा समावेश आहे. त्याप्रमाणे नगरसुल कोविड सेंटर मधील अंदरसुल येथील एका महीलेचा मृत्यू झाला आहे.
दुसरी लाट मोठी असल्याने जिल्ह्यातील व तालुक्यातीलच नव्हेतर ग्रामिण भागात सुध्दा कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्या अनुषंगाने येवला पंचायत समिती गट विकास अधिकारी उमेश देशमुख यांनी मंगळवारी बैठकी नंतर नगरसुल कोविड सेंटर पहाणी करून नगरसुल रेल्वे स्टेशन परिसरात सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक, आशावर्कर, आरोग्य विस्तार अधिकारी डॉ. खैरे हे घरोघरी जाऊन प्रत्येकाची विचारपूस करून नोंद घेत आहे. हे कामकाज कसे चालू आहे ते पाहण्यासाठी देशमुख यांच्या सह नगरसुल ग्रामविकास अधिकारी गोरख निकम आदी कर्मचारी सहभागी होते.

नगरसुल येथील कोरोनाची संख्या वाढत असल्याने जनतेने काळजी घेणे आवश्यक आहे. तोंडाला मास्क, सतत सॉनिटायझर, सोशल डिस्टीगशचे पालन, हात वारंवार साबणाने धुणे, विनाकारण न फिरणे, स्व:ताची व कुटुंबाची काळजी घेतल्यास सहाजीक गावाची देखील काळजी घेतली जाईल नियम पाळा कोरोना टाळा.
- मंदाकिनी पाटील, सरपंच, नगरसुल. 

Web Title: Health forces deployed to prevent corona outbreaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.